मुंबई-मुंबईतील 7 रेल्वेस्थानकांची इंग्रजकालीन नावे बदलणार:विधान परिषदेत प्रस्ताव मंजूर, मंजुरीसाठी केंद्राकडे
मुंबईतील ७ रेल्वेस्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मंगळवारी विधान परिषदेत मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. करी रोड, सँडहर्स्ट रोड, मरीन लाइन्स, चर्नी रोड, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड, किंग्ज सर्कल या स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
राज्याचे संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याद्वारे सादर केलेला प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर केला. मुंबईत यापूर्वीही व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व एलफिन्स्टन रोडचे नाव बदलून प्रभादेवी केले होते.
करी रोड स्थानकाचे नाव बदलून लालबाग, सँडहर्स्ट रोडचे डोंगरी, मरीन लाइन्सचे मुंबादेवी आणि चर्नी रोडचे नाव बदलून गिरगाव केले जाईल. सँडहर्स्ट रोड स्थानकाचे नाव सेंट्रल मार्गासोबतच हार्बर लाइनवरही बदलले जाईल. अन्य स्थांकांत कॉटन ग्रीनचे नाव काळाचौकी, डॉकयार्ड रोडचे माझगाव व किंग सर्कलचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ केले जाईल.