पुणे-आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून रांधे (ता. पारनेर) येथील तरुणाचा मोशी (भोसरी, पुणे) येथील औद्योगिक परिसरात खून करण्यात आला. मृत तरुणासोबत आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तरुणीच्या भावाने नातेवाइकाच्या मदतीने मेहुण्याचा हा खून केल्याचे समोर आले आहे. तीन आठवड्यापूर्वी (१५ जून) घडलेल्या घटनेचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले.
आमिर शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आमिरच्या हत्येप्रकरणी पंकज विश्वनाथ पाईकराव, गणेश दिनेश गायकवाड, सुशांत गोपाळा गायकवाड, सुनील किसन चक्रनारायण यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पंकज पाईकराव, सुशांत गायकवाड व सुनील चक्रनारायण यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय झोन तीनचे पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिली.यासंदर्भात भोसरी एमआयडीसी पोलिस तसेच स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, रांधे येथील आमिर शेख व त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या तरुणीने ४ महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या अपरोक्ष आळंदी (पुणे) येथे आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यानंतर ते दोघे मोशी (भोसरी, पुणे) येथे राहत होते. आमिर हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या भावाने आपला मेहुणा व अन्य एका नातेवाईकांच्या मदतीने १५ जून रोजी अमिरचा गळा आवळून खून केला. नंतर त्याचा मृतदेह आळंदी-चाकण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी झुडपांत नेऊन जाळला. दरम्यान आमिरच्या पत्नीने आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती. आमीरचा घातपात झाल्याचा संशय त्याच्या नातेवाइकांनी भोसरी पोलिसांकडे व्यक्त केला. पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यावर आमिरच्या खुनाचा उलगडा झाला.
दोन्ही कुटुंबे 20 वर्षांपासून शेजारी
मृत आमिर शेखचे त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांची कुटुंबे गेल्या २० वर्षांपासून एकमेकांचे शेजारी राहत होती. दोन्ही कुटुंबात सलोख्याचे संबंध होते. मात्र प्रेमविवाहाने मोठी दरी पडली होती. त्याची परिणती आमिरच्या हत्येत झाली.
आंतरधर्मीय विवाह केल्याने पारनेरच्या आमिर शेखची मोशीत हत्या करून प्रेताची विल्हेवाट
Date: