पुणे- केंद्रीय मंत्री झाल्यावर मुरलीधर मोहोळ यांनी कामाचा झपाटा सुरु केला आहे, pmpml, मेट्रो, महापालिका,विमानतळ येथील बैठकांबरोबर त्यांनी रेल्वेच्या पुणे विभागाच्या विविध विकासकामांचा आणि प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला.यानंतर रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इंदूराणी दुबे म्हणाल्या,हे मंत्री निश्चित पुणे रेल्वेचा विस्तार करतील,उत्साही आहेत आणि काही चांगले करण्याची त्यांची इच्छ्याशक्ती पाहून असे नक्की वाटते कि आता पुण्याच्या रेल्वेची रखडलेली कामे मार्गी लागतील.
मोहोळ यांनी रेल्वेच्या पुणे विभागातील विकास प्रकल्प, प्रलंबित प्रश्न आणि भविष्यातील नियोजनाचा आढावा मध्ये रेल्वेच्या पुण्यातील कार्यालयात बैठक घेऊन घेतला. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमत इंदूराणी दुबे यांच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या या बैठकीत विविध मुद्दे चर्चिले गेले. बैठकीच्या प्रारंभी श्रीमती दुबे यांनी पुणे विभागाच्या सद्यस्थितीची माहिती देणारे सविस्तर PPT दिले. यात वेगवेगळे पायाभूत प्रकल्पांची माहिती, नव्या रेल्वे मार्ग, रेल्वे मार्गातील पूल आणि रेल्वे स्थानकांचा विस्तार याबाबत सविस्तर माहिती घेतली. पुणे ते लोणावळ्या दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या माहितीसह पुणे-बारामती, पुणे-अहिल्यानगर, पुणे-नाशिक हायस्पीड मार्ग प्रकल्प आदींबाबत सविस्तर चर्चा केली. या विषयांवर मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. पुणे रेल्वे स्थानकाच्या सद्यस्थितीला उपलब्ध असलेल्या जागेचा वापर करुन काय-काय करता येऊ शकेल? यावरही चर्चा केली. स्थानकाच्या विस्तारासंदर्भातही यावेळी मुद्दे मांडले. पुणे आणि शिवाजीनगर या दोन्ही स्थानकांच्या विकासाबाबतही चर्चा केली. पुण्याच्या विकासाच्या बाबतीत मैलाचा दडग ठरणाऱ्या प्रस्तावित ‘मेगा कोचिंग टर्मिनल’बद्दलही सखोल माहिती घेतली. रेल्वे मार्गावरील ओव्हर आणि अंडर पास ब्रीज लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.