सुधाकर अंबोरे व राहुल तायडे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Date:

मुंबई, दि. ८ जुलै २०२४

चंद्रपूर जिल्ह्यातील माजी पोलीस अधिकारी सुधाकर कुंडलिक अंबोरे आणि सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक राहुल निरंजनराव तायडे यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन, दादर येथे आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष धोटे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यावेळी उपस्थित होते. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी दोघांचेही काँग्रेस परिवारात स्वागत करुन काँग्रेस विचार घरोघरी पोहचवा असे आवाहन केले.

“काँग्रेस पक्षाची विचारधारा हीच शाश्वत असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष विजयाचे एक एक शिखर पार करत आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला कौल दिला. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातून सर्वात जास्त जागा जिंकत राज्यात दैदिप्यमान कामगिरी करत काँग्रेस हाच पर्याय असल्याचे दाखवून दिले आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही सर्वात जास्त जागा जिंकून विधानसभेवर काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकवू”, असा विश्वास प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात:उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक नाशिक, दि. 14...

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ४४ व्या फळे, फुले आणि भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त, उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या...

टाटा एआयएने आणले ‘एन्हान्स्ड व्हॅल्यू इंडेक्स फंड्स’

प्रियजनांची सुरक्षा आणि भविष्यातील प्रगती: गुंतवणुकीचा सर्वात स्मार्ट मार्ग हा...

रौप्य महोत्सवी ब्रह्मनाद संगीत महोत्सव दि. २० फेब्रुवारीपासून

धायरीत आयोजन : पंडित सत्यशील देशपांडे यांना ब्रह्मनाद पुरस्कार पुणे...