“महिलांनो डरना मना है, राज्यात आघाडीची सत्ता आणा – खा.सुप्रिया सुळे

Date:

पुणे-काश्मीर ते कन्याकुमारी आपला भारत एक आहे. हे मतदारांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. हे सरकार कधी पर्यंत चालेल माहीत नाही, मात्र आम्ही सरकार अस्थिर करणार नाही. हे कॉपी करून आलेले सरकार आहे. लोकसभा निवडणुकीत महिला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना धमकावण्यात आले. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभेत कितीही धमकी येऊ द्या ‘ बहिणीनो डरना मना आहे ‘ आता येणाऱ्या विधानसभेसाठी ७० दिवस शिल्लक राहिलेत, घरोघरी आपल्याला पोहोचून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आणायचे आहे, असे आवाहन संसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे व बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नागरिक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले होते. यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जाहेद सय्यद, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक योगेश ससाणे, रवींद्र माळवदकर, हेमंत बधे, वंदना मोडक, सविता मोरे, रुपाली शिंदे, आसिफ शेख, पप्पू घोलप, दिपक कामठे, मोहमद्दीन खान, बाळासाहेब कवडे, आसिफ पटेल, रोहित गुंजाळ आदी उपस्थित होते.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे भाजपचे सरकार नसून महागाई , बेरोजगार, भ्रष्टाचाराचे सरकार आहे.  असे बोलून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले,
हा देश तुमचा आमचा सर्वांचा आहे. जाती भेदाच्या भिंती तोडून देश एकसंघ  कसा राहील हे पाहण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ज्या विश्वासाने मतदारांनी मला मतदान केले आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुकांची घाऊक गर्दी दिसून आली. वेगवेगळे पदाधिकारी वाजत गाजत कार्यकर्त्यांच्या गर्दी जमा करून आपले शक्ती प्रदर्शन दाखवीत होते. आगामी विधानसभेच्या निवडणुकीनंतर लागलीच महापालिकेची निवडणूक होणार असल्याने इच्छुकांनी आपल्या नेत्यांपुढे शक्तिप्रदर्शन केले.
यावेळी शैलेश बेल्हेकर, शादाब खान, यांचा पक्षात प्रवेश झाला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, पुणे (दि. १३...

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत...

महापालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची झाली निवड

पुणे - महापालिकेच्या मुख्य सभेत आज स्थायी समिती सदस्यांच्या...