पुणे- एका अल्पवयीन मुलाकडे पिस्टल सापडले आणि त्याच्या २० वर्षीय साथीदाराकडे आणखी 1 पिस्टल सापडले तसेच एकूण ३ काडतुसे प्राप्त झाली अशी माहिती पुणे पोलिसांनी येथे दिली आहे. पोलिसांनी असे सांगितले कि,’पर्वती पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करुन भविष्यात होणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अधिकारी सचिन पवार व स्टाफ गस्त करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार अमोल दबडे व अमित चिव्हे यांना त्यांचे खास बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, पर्वती पायथा कमानीचे जवळ रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे पिस्टल असुन तो कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाची टीम तयार करुन बातमीच्या ठिकाणी सापळा रचुन एका विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवुन त्याचे कडुन ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०१ जीवंत काडतुस ताब्यात घेण्यात आले, त्याचेकडे अधिक तपास करता त्याने त्याचा साथीदार पर्वती पो.स्टे. कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार अमन अंबीर झारेकरी, वय २० वर्षे, रा. महालक्ष्मी बिल्डींग, दांडेकर पुल पुणे याने सदरचे पिस्टल ठेवण्यास दिल्याचे सांगितले. त्यावरुन गुन्हयाचा अधिक तपास करता नमुद आरोपी अमन झारेकरी यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याचेकडुन आणखीन ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. त्याबाबत पर्वती पोलीस ठाणेस गुन्हा रजि.नं.२२३/२०२४ आर्म अॅक्ट कलम ३(२५), म.पो.अधि. कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
रेकॉर्ड वरील आरोपी अमन अंबीर झारेकरी व विधीसंघर्षीत बालकाकडुन पर्वती पोलीस ठाणे कडील गुन्हयातील ६१,०००/- रु.कि.चे ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०३ जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आलेली आहेत. दाखल गुन्हयाचा अधिक तपास फौजदार सचिन पवार करत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस उप-आयुक्त परि.३ संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सिंहगड विभाग जगदीश सातव, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, एपीआय राहुल नामदे तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक सचिन पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमित चिव्हे, अमोल दबडे, अनिस तांबोळी, सुर्या जाधव, सद्दाम शेख, पुरुषोत्तम गुन्ला यांनी केली आहे.