पुणे, दि. ४: समाजकल्याण विभागामार्फत केंद्र शासनाची स्टॅन्ड अप इंडिया ही योजना राबविण्यात येत असून अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्टॅन्ड अप योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांना एकूण प्रकल्प किंमतीच्या २५ टक्के स्वहिस्सा रकमेपैकी जास्तीत जास्त १५ टक्के मार्जीन मनी वितरीत करण्यात येते. पात्र लाभार्थ्यांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅन्ड अप योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येते.
इच्छुक नागरिकांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण जिल्हा पुणे यांचे कार्यालय, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा, पुणे ४११००६, (दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११) येथे अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

