Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मनुवादी किडे;मनोहर भिडे घोषणा देत भिडेंच्या अटकेसाठी पुण्यात जोरदार आंदोलन

Date:

महिलांचा अपमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

पुणे-मनुवादी किडे;मनोहर भिडे घोषणा देत भिडेंच्या अटकेसाठी पुण्यात राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाने जोरदार आंदोलन शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली केले. यावेळी जगताप म्हणाले,’ मनोहर भिडे नावाचा विकृत मनुवादी माणूस महिलांना नेहमी दुय्यम समजून महिलांनी कसा पेहराव केला पाहिजे याचं ज्ञान देत असतात. आता नुकतेच जीन्स घालणाऱ्या, महिलांनी नटिंनी वटसावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करू नये अशी मुक्ताफळे उधळली.आपल्या महाराष्ट्र राज्याला पुरोगामी विचारांचा शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. राजमाता माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या रणरागिणीणींनी स्वकर्तुत्वाने इतिहास रचला.अशा कर्तृत्ववान महिलांचा वारसा जपणाऱ्या महिलांचा मनोहर भिडे नामक मनुवादी विकृताने अपमान केला. सध्या राज्यात असलेले मनुवादी सरकार हे मनोहर भिडे सारख्या विकृत मानसिकतेला नेहमीच अभय देत आले आहे.
मनोहर भिडे व त्याला बळ देणारे मनुवादी सरकार यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई पुतळा, संभाजी उद्यान चौक, जंगली महाराज रस्ता येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. “मनुवादी किडे मनोहर भिडे, मनुवादी सरकार मुर्दाबाद, मनोहर भिडे मुर्दाबाद, मी सावित्रीची वारसदार करते भिडेचा धिक्कार, मी जिजाऊंची वारसदार करते भिडेचा धिक्कार” अशा घोषणांनी संपूर्ण शिवाजीनगर परिसर दुमदुमला होता.
या आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात किशोर कांबळे, मृणालिनीताई वाणी, रुपालीताई शेलार, दिलशादताई आत्तार, स्वप्नील जोशी, केतन ओरसे, राजेश आरने, संजय दामोदरे, प्रविण आल्हाट, तनया साळुंखे, भाई कात्रे, हेमंत बधे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, गणेश नलावडे, पूजा काटकर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत,अमित शाह म्हणाले,बदल लिया जायेगा …

जम्मू आणि काश्मीर सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या...

रूपाली ठोंबरे पाटील पती, कुटुंबासह जम्मू काश्मीरमध्ये अडकल्या..

पुणे-अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे...

9370960061 पुण्यातील पर्यटकांसाठी प्रशासनाचा क्रमांक:264 पुणेकर पुलगावमध्ये अडकले; सर्वांना सुखरूप आणणार -मोहोळ

पुणे-जम्मू-काश्मिरातील अडकलेल्या सर्व पर्यटकांच्या आम्ही संपर्कात आहोत. आज संध्याकाळी...