शासकीय योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत ‘संवादवारी’ उपक्रमाचे आयोजन

Date:

पुणे: शासकीय योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आषाढीवारी कालावधीत आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर या दोन पालखी मार्गावर राज्य शासनाचा चित्ररथ, एलईडी मोबाईल व्हॅन, प्रदर्शन संच, मोबाईल व्हॅनसह लोककला पथक, पथनाट्याच्या माध्यमातून ‘संवादवारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘संवादवारी’ हा उपक्रम १ ते १९ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात पुणे विभागातील सासवड येथे २ जुलै रोजी पालखीतळ, वाल्हे येथे ४ रोजी जिल्हा परिषद शाळा क्र. १ व २, लोणंद येथे ६ रोजी पालखीतळ, फलटण येथे ८ रोजी पालखीतळ, बरड येथे १० रोजी नगरपरिषद आवार, नातेपुते येथे ११ रोजी पालखीतळ, माळशिरस येथे १२ रोजी कृषी विभाग मैदान, भंडी शेगाव येथे १४ रोजी ग्रामपंचायत शॉपींग सेंटरसमोर, वाखरी येथे १५ रोजी ग्रामपंचायत आवार व पंढरपूर येथे आषाढी यात्रेदरम्यान शासनाच्या योजनांवर आधारित प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान कदमवाक वस्ती येथे २ जुलै रोजी पालखीतळ, यवत येथे ३ रोजी जिल्हा परिषद शाळा क्र.१ व २, वरवंड येथे ४ रोजी, उंडवडी गवळ्याची येथे ५ रोजी पालखी तळ, बारामती येथे ६ रोजी नगरपरिषद, आंथुर्णे येथे ८ रोजी, इंदापूर येथे १० रोजी पंचायत समिती आवार, अकलूज येथे ११ व १२ रोजी पंचायत समिती आवार, पिराची करोली येथे १३ रोजी पालखीतळ, वाखरी येथे १४ व १५ रोजी पालखी मार्गासमोरील मोकळ्या जागेत व पंढरपूर येथे आषाढीवारी दरम्यान संवादवारी आयोजित करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात आले आहे.
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकतकराच्या भल्या मोठ्या रकमेने ‘तो’ हादरला ? अन पिस्तूल काढून म्हटलं बास आता खेळ खलास झाला..!

पुणे महापालिकेच्या भवनातला प्रकार पुणे- शासकीय,निमशासकीय संस्था हल्ली सामान्य...

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, पुणे (दि. १३...

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत...