कात्रज-कोंढवा रस्ता भूसंपादनासाठी १४० कोटीचा शासननिधी अखेर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला -योगेश टिळेकर

Date:

पुणे- कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेस राज्य शासनाकडून येणारे १४० कोटी महापालिकेला मिळवून देण्यात आपल्याला यश आल्याचा दावा आज येथे माजी आमदार आणि विधानपरिषदेचे भाजपचे विद्यमान उमेदवार योगेश टिळेकर यांनी केला आहे .

टिळेकर म्हणाले,’ कात्रज; कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मी व माझ्या सहकाऱ्यांनी २० वर्षे संघर्ष करून नोव्हेंबर २०१८ साली तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते २१० कोटीच्या रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन करून काम सुरू केले होते. सदर रस्ता रुंदीकरणासाठी मी, माझे नगरसेवक व परिसरातील नागरिकांनी अनेक वर्ष संघर्ष करून ह्या रस्त्याचे कामे सुरु केले होते. या विषयी अनेक वृत्तपत्रांनी हि आवाज उठवला होता. परंतू महाविकास आघाडी सरकार च्या काळात या रस्त्याचे काम जवळ पास बंद झाले होते. रस्ता रुंदीकरण्यातील जागा ताब्यात देण्यासाठी नागरिकांना रोख रक्कमेच्या मागणीसाठी भडकवले गेले. ज्यांनी या नागरिकांना भडकवले त्यांनी स्वतःच्या महाविकास आघाडी सरकारकडे भूसंपदानासाठी लावणाऱ्या निधी ची मागणी केली नाही. सुदैवाने राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मी दि.२५/०८/२०२२ रोजी या रस्त्याची जागा भूसंपादनाच्या निधीची मागणी केली. सदर निधी देवेंद्र फडणवीस यांनी दि. १४/०१/२०२३ रोजी निधी मंजूर केला. त्यानंतर कामाची प्रत्यक्ष पाहणी पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सर्व अधिकारी, पोलीस अधिकारीसह पाहणी केली. त्यानंतर राज्यसरकारने तात्काळ निधी मंजूर केला. या नंतर या कामास गती मिळाली. काही जागा ताब्यात घेण्यासाठी गतीमिळाली. काही ठिकाणी दुभाजक बसविण्यात आले. काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात आले. वाहतूक सुरक्षारक्षक नेमण्यात आले. रस्त्यातील विद्युत पोल हलवण्यात आले. अशी अनेक छोटी मोठी कामे सुरू झाली. सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये (बजेट) २०० कोटीची तरतूद करण्यात आली. महायुती सरकारने सदर कामासाठी लागणाऱ्या निधीचा दि.१५/०३/२०२४ रोजी शासन निर्णय (अध्यादेश) केला. हा शासन निर्णय लोकसभेच्या आचारसंहितेच्या बरोबर २ दिवस अगोदर मंजूर झाल्याने निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ३ महिने विलंब झाला. होती. सदर आचारसंहिता संपल्यानंतर मी लगेचच स्वतः देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजितदादा पवार व मंत्रालयामध्ये पाठपुरावा वित्तीय मान्यता घेऊन इतर कायदेशीर तात्रिक बाबींची पुर्तता करून दि.०१/०७/२०२४ रोजी हा निधी शासनाकडून महानगरपालिका कडे वर्ग झाल्याने हा रस्ता पूर्ण होण्याचा मार्गी मोकळा झाला आहे. शासनाने या रस्ता रुंदीकरणासाठी लागणारी जमिन अधिग्रहणासाठी लागणारा शासनाच्या हिस्सा पोटी १४० कोटी रुपये दिल्याब‌द्दल मी. कोंढवा, कात्रज, येवलेवाडी, पिसोळी परिसरातील नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब विशेषतत्वाने या रस्तासाठी कायम मदत करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी पालकमंत्री यांचे मनापासून अभार मानतो.तसेच रस्तारुंदीकरणातील बांधित जागा मालकांना विंनती करतो, कि आपण योग्य मोबदला घेऊन लवकरात लवकर जागा पुणे महानगरपालिकाच्या ताब्यात द्याव्यात अशी आपली संबधितांना कळकळीची विनंती आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पारंपरिक प्रचाराला आधुनिकतेची जोड! बीडकरांची प्रचारात आघाडी; प्रभाग २४ मध्ये फिरू लागले ‘विकासरथ’

पुणे-महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांच्या नजरा प्रमुख पक्षकांकडून...

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...