पुणे-ज्ञानोबा माउली , ज्ञानराज माउली तुकाराम .. अभंग आणि जयघोषात मोठ्या भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शहरात रविवारी (दि. ३०) आगमन झाले आहे. पुणे महापालिकेने दोन्ही पाळ्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले आपल्या परिवारासह पालख्यांचे आणि वारकर्यांचे स्वागत करताना दिसत होते.मिळकत कर प्रमुख माधव जगताप त्यांच्या समवेत होते.अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी त्याचबरोबर श्री माधव जगताप उपायुक्त श्रीमती किशोरी शिंदे श्री गणेश सोनवणे श्री शिंदे श्रीमती योगिता भोसले नगरसचिव श्री नागटिळक श्री दाबकेकर सहाय्यक आयुक्त यांनी स्वागत केले यावेळी सर्व दिंड्यांचे श्रीफळ व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले सदर सदर पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिकेने जयत तयारी केलेली होती यामध्ये पाण्याचे टँकर स्वच्छतागृह त्याचबरोबर पालखी मार्गावरील स्वच्छता इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली होती.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन आळंदी रस्त्यावरील सयाजीराव कुसमाडे संकुल (करसंकलन कार्यालय), कळस क्षेत्रीय कार्यालय, आळंदी रस्ता येथेझाल्यानंतर प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले पालखींचे दर्शन घेऊन स्वागत केले तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखीचे मुंबई पुणे रस्त्यावरील बोपोडी सिग्नल चौक येथे आगमन झाल्यानंतर प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले मुंबई पुणे रस्त्यावरील नाबार्ड बँकेसमोर पाटील इस्टेट वसाहतीशेजारी येथे दोन्हीही पालख्यांचे दर्शन घेऊन स्वागत करण्यात आले .

हातात भगव्या पताका, डोक्यावरी तुळस, टाळ – मृदंगाचा गजर आणि माऊली – तुकोबांचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दखल झाली आहे. लाखो वारकऱ्यांचा मेळा पंढरीच्या दिशेने निघाला आहे.तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्याच्या वेशीवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. फुलांच्या उधळणीत पालखी भवानी पेठेत मुक्कामी जाणार आहे.
प्रमुख रस्त्यांवर पुणेकर आतुरतेने वाट पाहताना दिसून आले आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिक पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. शहारत मध्यवर्ती भागात चोख पोलीस बंदोबस्त आला आहे. तसेच प्रशासनाकडून वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. सामाजिक संस्था, विद्यार्थ्यंनाकडून पर्यावरणपूरक संदेशही या पालखी सोहळ्यात दिले जात आहेत. महिला आणि तरुणींचा लक्षणीय सहभाग वारीच्या सोहळयात दिसू लागला आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी रात्री आकुर्डीत मुक्कामास होता. आकुर्डीकरांचे आदरातिथ्य स्वीकारून विठ्ठल मंदिरातून रविवारी पहाटे पाचला सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. पहाटे ट्रस्टचे विश्वस्त गोपाळ कुठे यांच्या हस्ते महापूजा झाली. समाजआरती होऊन पालखी मार्गस्थ झाली. पालखी खंडोबा माळ चौकातून पुणे मुंबई महामार्गाने पिंपरीतील खराळवाडी येथील मंदिरात सकाळी ६:४५ वाजता सोहळा पोहोचला. तिथे पहिला विसावा झाला. त्यानंतर सकाळी ८:३० च्या सुमारास सोहळा पुढे मार्गस्थ झाला. मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येत होते. तर ठिकठिकाणी राजकीय नेत्यांचे स्वागत फलक झळकल्याचे दिसून आले. त्यानंतर पालखी दर्शनासाठी नेहरूनगर, वल्लभनगर, परिसरातील भक्तांनी गर्दी केली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सोहळ्याचा वेग कमी झाला. पिंपरी ते नाशिक फाटा उड्डाणपुलाच्या दुतर्फा गर्दी केली होती. पालखी सोहळा नाशिकफाटामार्गे दापोडीत दुपारच्या मुक्कामास थांबला. अनेक राजकीय पक्षांच्या व सामाजीक संस्थेच्या वतीने चहा नाष्टा पाणी फळांचे वाटप करुन वारकऱ्यांची सेवा केली. दुपारच्या विसाव्यानंतर पालखी खडकीमार्गे पुण्यात प्रवेशीला गेली.
महापालिका देणार या सुविधा
आरोग्य विभाग : पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी फिरत्या दवाखान्यांद्वारे मोफत आरोग्यसेवा पुरविली जाणार आहे. रविवारी मनपाचे वैद्यकीय पथक (जुना फिरता दवाखाना) वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्स, नर्सिंग ऑर्डर्ली व प्रथमोपचारासह पुणे-मुंबई रस्त्यावरील फुले नगर (विश्रांतवाडी), पुणे-मुंबई रस्त्यावरील पाटील इस्टेट वाकडेवाडी, साखळपीर तालीम येथे उपस्थित राहील. पालखीसोबत रफी महंमद किडभाई शाळा, भवानी पेठ पोलीस चौकीसमोर, रामोशी गेटपर्यंत राहील. व दर्शनाला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी/ भाविकांसाठी मोफत उपचार करण्यात येतील.
पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत रफी महंमद किडभाई शाळा, भवानी पेठ व मामासाहेब बडदे दवाखाना, नाना पेठ येथे प्राथमिक उपचारासाठी २४ तास दवाखाने कार्यरत ठेवण्यात येऊन वारकऱ्यांना मोफत उपचार करण्यात येतील. पुणे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील १० टक्के बेड्स (खाटा) आरक्षित ठेवणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच दवाखाने, प्रसूतिगृह/रुग्णालये येथे मोफत तपासणी व उपचार दिले जाणार आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पुणे मनपाचे वैद्यकीय पथक पुणे ते पंढरपूर मुक्कामापर्यंत पाठविण्यात येणार आहे. कीटकनाशक विभागामार्फत पालखी मार्ग, सर्व दिंड्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येणार आहे. तसेच पशुवैद्यकीय विभागामार्फत पुणे मनपा हद्दीतील भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभाग :
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सर्व सार्वजनिक रस्त्याचे झाडझूड, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात दिवसातून तीन वेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यात येणार आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत स्वच्छता विषयक कामकाज करण्यासाठी अंदाजे एकूण ३५० पुरुष सफाई सेवक व २५० महिला सफाई सेविका असे एकूण ६०० सफाई सेवक कार्यरत आहेत. १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकूण अंदाजे १६९० पोर्टेबल व फिरते शौचालयाची सोय करण्यात आलेली असून दिवसातून तीन वेळा स्वच्छता करण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत महिला वारकऱ्यांसाठी आवश्यकतेनुसार मनपा शाळेत व खासगी शाळेत मुक्कामाच्या ठिकाणी शौचालय व महिलांसाठी न्हाणी घराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यावर व वारकरी मुक्कामी असलेल्या ठिकाणी स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून २,६२५ लिटर जर्मीक्लीन, ३७,५०० किलो कार्बोलिक पावडर व ११,२५० किलो हर्बल वेस्टस्ट्रीट पावडर इत्यादी पुरविण्यात येणार आहे. महिला वारकऱ्यांसाठी ५०,००० सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभाग, शिक्षण मंडळ, पाणीपुरवठा विभाग, मलनिस्सारण विभाग, गलिच्छ वस्ती निर्मूलन विभाग, विद्युत विभाग, वाहन विभाग, भवन रचना, ड्रेनेज, पथ विभाग, आरोग्य, अतिक्रमण, उद्यान, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांनी जय्यत तयारी केलेली आहे.