नवी दिल्ली-दिल्लीत गुरुवारी रात्री उशिरापासून सुरू असलेल्या पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 चे छत कोसळले. अनेक टॅक्सी आणि गाड्यांना त्याचा फटका बसला. त्यात बसलेले सहा जण जखमी झाले. वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजता घडली.दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) अधिकाऱ्यांनी सांगितले की टर्मिनल-1 च्या छताच्या शीट व्यतिरिक्त, सपोर्ट बीम देखील कोसळला आहे. यामुळे टर्मिनलच्या पिक-अप आणि ड्रॉप भागात उभ्या असलेल्या गाड्यांचे नुकसान झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानतळावर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आहेत.
नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी X वर लिहिले, ‘मी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सर्व विमान कंपन्यांना टर्मिनल १ वर बाधित प्रवाशांना मदत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. घटनास्थळी बचाव पथके काम करत आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे.दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी पहिला मान्सूनपूर्व पाऊस झाला. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिल्ली-एनसीआरमधील अनेक भाग रात्रभर पाण्यात बुडाले. काही ठिकाणी 3 ते 4 फूट पाणीपातळी आहे.