मुंबई-‘एक चेहरे में कहीं चेहरे लगा लेते हैं लोग’ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. काही महिण्यातच त्यांचा असली चेहरे जनतेसमोर येईल, असा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचणार नाही. ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्याने अडकले असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्ट मधून प्रवास केल्याची आज दिवसभर चर्चा होती. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर देखील मुख्यमंत्र्यांनी जोरदार निशाणा साधला. लंडनमधील पंचतारांकित हॉटेल पेक्षा महाराष्ट्रातील पंचतारांकित शेती चांगली नाही का? असा प्रति प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला.
लंडनमधील पंचतारांकित हॉटेल पेक्षा पंचतारांकित शेती कधीही चांगली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या आरोपावर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. शेतकऱ्यांनी पंचतारांकित शेती करूच नाही का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आम्ही शेताच्या बांधावर जाणारे लोक आहोत, शेतकऱ्यांशी संवाद साधणारे आहोत, त्यांनी बांद्राच्या बाहेर निघून बांधा कधी पाहिला आहेत का? त्यांना शेतकऱ्यांचे दुःख काय कळेल? त्यासाठी इसारवाडी सारख्या ठिकाणी जावे लागते. येथे वर्क फॉर्म चालत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यासाठी सर्वांची कामे करावी लागतात, असा टोला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंची भाऊ कुठे गेले? याचा त्यांनी पुनर्विचार करावा
आम्ही लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी लेक देखील करू. मात्र, बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत? असा प्रति प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. आम्ही सर्व भाऊ बहिणींचा विचार करणारे आहोत. हे तुम्हाला कळलेच मात्र, त्यांनी त्यांचे भाऊ कुठे गेले, याचा पुनर्विचार करावा? अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. एका प्रकारे राज ठाकरे आणि ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यांच्या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोट ठेवले आहे.
उद्धव ठाकरे हे लिंबू मिरच्या वाले, अडीच वर्षे ते सिकर होते का?
उद्धव ठाकरे हे लिंबू मिरच्या वाले असून त्यांच्या डोक्यात कायम अमावस्या, पौर्णिमा असते. असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. महायुतीचे सरकारी मजबुतीने काम करत आहेत, असा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. अडीच वर्षे उद्धव ठाकरे सिकर होते का? असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्याचा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा प्रश्न टाळला, अजित पवारांच्या प्रश्नावरही उत्तर नाही
महायुतीचे एकजुटीने काम सुरू आहे. आमच्यात नाराजी नाही, असा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. अजित पवार गटाबाबतच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली नाही. मुख्यमंत्री पदाबद्दल महाविकास आघाडीमध्ये वाद झाला, तर याचे उत्तर त्यांना विचारा, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचे उत्तरही टाळले आहे.