पुणे-भारती विद्यापीठ पोलिसांनी २ मुलांना पकडून चार ठिकाणी झालेल्या मोबाईल चोऱ्यांचा तपास निकाली लावला . यातील एक आरोपी १९ वर्षाचा आहे तर दुसरा अल्पवयीन मुलगा असून दोघे मुळ झारखंडचे आहेत .
या संदर्भात पोलिसांनी सांगितलेकी,’ दिनांक २१/०६/२०२४ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अंमलदार चेतन गोरे, हनमंत मासाळ, सतिश मोरे, तसेच कात्रज मार्शलकडील सचिन पवार, विठ्ठल चिपाडे हे कात्रज बस स्टॉपचे भागात पेट्रोलींग करीत असताना त्यांना मोरे बाग बस स्टॉपवर दोन मोबाईल चोरणारी दोन मुले थांबली आहेत अशी खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार नमुद स्टाफने तात्काळ मोरे बाग बस स्टॉपवर येथे जावुन बातमी प्रमाणे मुलांचा शोध घेतला असता त्यांना इसम नामे गणेशकुमार गोंगा महतो, वय १९ वर्षे, रा. तिन पहाड, बहपुर, ठाणा राजमहल, जिल्हा साहेबगंज, राज्य झारखंड व एक विधीसंघर्षीत बालक असे मिळुन आली असुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडुन एकुण ७५,०००/- रुपयांचे चार मोोबईल फोन जप्त करण्यात आले असुन आरोपी गणेशकुमार गोंगा महतो यास अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५२२/२०२४ भांदंवि कलम ३७९
२. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५२५/२०२४ भांदंवि कलम ३७९
३. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५२६/२०२४ भांदंवि कलम ३७९
४. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५२८/२०२४ भांदंवि कलम ३७९
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. श्रीमती स्मार्तना पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, हनमंत मासाळ, सतिश मोरे, सचिन पवार, विठ्ठल चिपाडे, शैलेश साठे, निलेश जमदाडे, सचिन सरपाले, नामदेव रेणुसे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, विक्रम सावंत, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.