पुणे:पुणे पोलिसांचा अंत पाहू नका सुरुवातीला हात जोडू. पण संयम जर तुटला तर कडक कारवाई केली जाईल आणि आमची ही दादागिरी काय असते ते तुम्हाला दाखवून देऊ असा सज्जड इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध व्यवसाय करणारे यांना दीला. जे कोणी समाजामध्ये भांडण अथवा जर कोणी अवैध धंदे करत असतील त्यांनी पोलिसांचा अंत पाहू नये .. तसेच पालकांनीही आपल्या मुलांना चुकीच्या व्यसनापासून दूर ठेवाव.याकरता विशेष करून महिला यांनी आपल्या मुलांचं चांगल्या गोष्टींकरता प्रबोधन करावे आणि त्यांना चांगल्या सवयी लावाव्या .तरच बाल गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल.. पण जर चुकीच्या गोष्टी सांगूनही काही लोक करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.
नागपूर चाळ येथे सामाजिक सलोखा, वाढती व्यसनाधीनता आणि बाल गुन्हेगारीवर अमितेश कुमार यांनी पहिल्यांदाच पुणेकर नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या विविध समस्या गुन्हेगारी बाबतच्या जाणून घेतल्या.तसेच त्यांनी येरवडा परिसरातील जे काही गुन्हेगार आहेत त्यांची झाडाझडती घेण्याची सूचनाही संबंधित पोलीस निरीक्षक यांना त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिलेले आहेत. येरवडा परिसरातील समता नगर येथ डॉक्टर सिद्धार्थ धेंडे आणि राहुल डोंबाळे यांच्या पुढाकारातून सामाजिक सलोखा , बाल गुन्हेगारी , वाढती व्यसनाधिनता व कायदा सुव्यवस्थे बाबत … पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नागरी संवादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील,माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,राहुल डोंबाळे उपस्थित होते.