१२ हॉटेलातील ३८,७०० चौ. फूट अतिक्रमण उध्वस्त केले
पुणे-महापालिकेच्या बांधकाम आणि अतिक्रण निर्मुलन विभागाने विभागाने गेली काही दिवसांपासून चालविलेल्या अनधिकृत बांधकामआणि अतिक्रमण निर्मुलन मोहिमेत साईड मार्जिन,फ्रंट मार्जिन मध्ये बांधलेली तसेच विनापरवाना बांधलेली हॉटेल्स,बार आणि पब्ज ला लक्ष केले असून त्या अंतर्गत आज बाणेरच्या हॉटेल्स,बार्स वर जेसीबी फिरविण्यात आला. प्रत्यक्षात किरकोळ भिंती पत्रे वापरून केलेली पण रात्रीच्या अंधारात झगमगणारी अलिशान हॉटेल्स पडताना कशी पत्र्याची आणि साध्या सुध्या भिंतींची होती याचा प्रत्यय ती पडताना स्पष्ट पणे येत होता.आज महापालिकेने १२ हॉटेलातील ३८,७०० चौ. फूट अतिक्रमण उध्वस्त केले .

या १२ हॉटेल्स वर आज कारवाई करून ३८ हजार ७०० चौरस फुटाचे अतिक्रमण उध्वस्त केले .
- F.M.L. कारवाई पूर्ण क्षेत्र. १२,०००.०० चौ.फूट.
- The corner lodge कारवाई पूर्ण क्षेत्र. ३,०००.००चौ.फूट.
- Esco bar कारवाई पूर्ण क्षेत्र. ८,०००.०० चौ.फूट.
- Elephant Bar. कारवाई पूर्ण क्षेत्र. १,०००.०० चौ.फूट.
- Brew marchant cafe. कारवाई पूर्ण क्षेत्र. १,५००.०० चौ.फूट.
- Urbo Kitchen Bar. कारवाई पूर्ण क्षेत्र. ३,०००.०० चौ.फूट.
- Native bar. कारवाई पूर्ण क्षेत्र. २,०००.०० चौ.फूट.
- The Joyes boy. कारवाई पूर्ण क्षेत्र. ८००.०० चौ.फूट.
- Filament Bar. कारवाई पूर्ण क्षेत्र. ३,२००.०० चौ.फूट.
- ३ Muskiters कारवाई पूर्ण क्षेत्र. ६००.०० चौ.फूट.
- मनाली बार ( बालेवाडी) कारवाई पूर्ण क्षेत्र. १,२००.०० चौ. फूट.
- डॉक यार्ड ( बालेवाडी) कारवाई पूर्ण क्षेत्र. २,४००.०० चौ.फूट.
एकूण कारवाई क्षेत्र ३८,७००.०० चौ. फूट.