Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

७० लाखाच्या,महत्वपूर्ण पुण्याला राजकारणातून डॅमेज करू नका -चंद्रकांतदादा पाटलांचे आवाहन

Date:

मिडिया माझ्यात व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

पुणे-७० लाखाचे देशातील महत्वपूर्ण शहर पुणे असून शहराची प्रतिमा व्यसनामुळे वाया गेलेले शहर असे करणे बंद केले पाहिजे. प्रशासनाने वाढत्या पब्ज बार याबाबत दक्षता पथक निर्माण करुन नागरिकांना सहभागी करुन घेतले पाहिजे. पब, बियरबार आठवड्यातील ठराविक दिवस बंद करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन नियमावली केली पाहिजे. रात्री किती वाजेपर्यंत चालवले पाहिजे याबाबत निर्णय घ्यावा. एखादी घटना घडल्यावर केवळ प्रशासनाने कारवाई न करता त्याबाबत नियमित कारवाई करणे गरजेचे आहे,अंमली पदार्थ बंदी विषयावर मी पळ काढलेला नाही कारण माझी मंत्री, आमदार, नागरिक म्हणून जबाबदारी आहे. माझ्या एका वाक्याचा मिडियाने विपर्यास केला आहे. माझ्या पालकमंत्री काळात समाजाला विघातक घटना घडल्याचे नाही असे मी म्हणत नाही. मिडिया माझ्यात व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद निर्माण करत असले तरी तसे हाेऊ शकणार नाही. काेण्या एका मंत्र्यावर दाेषाराेप ठेऊन हा विषय संपणार नाही, मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे बोलताना व्यक्त केले. ते जागतिक अंमली पदार्थ विराेधी दिनानिमित्त पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या संगमेश्वर फाऊंडेशन आयाेजित अंमली पदार्थ विराेधी दिन व्यंगचित्र प्रदर्शन कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बाेलत हाेते.

चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले,पब, बियरबार आठवड्यातील ठराविक दिवस बंद करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन नियमावली केली पाहिजे. रात्री किती वाजेपर्यंत चालवले पाहिजे याबाबत निर्णय घ्यावा. एखादी घटना घडल्यावर केवळ प्रशासनाने कारवाई न करता त्याबाबत नियमित कारवाई करणे गरजेचे आहे.उच्च शिक्षण विभागातर्फे राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात अंमली पदार्थ विराेधी जनजागृती करण्यात येईल. सर्व पब, बार हे बंद केले पाहिजेत. ते किराणा दुकानांसारखे गरजेचे नाही. विषारी दारु बनविणाऱ्या ठिकाणचे कर्मचारी बेराेजगार हाेतील म्हणून त्यांना उद्याेग करुन द्यावा असे हाेऊ शकत नाही. त्याप्रमाणे पब मधील कर्मचारी बेराेजगार हाेतील तर त्यांना दुसरा राेजगार दिला पाहिजे. पहाटे 4 वाजेपर्यंत पब सुरु ठेवता येणार नाही, अल्पवयीन मुलांना दारु, ड्रग देता येणार नाही. त्यामुळे पबवाल्यांनी बाेलताना भान ठेवावे नियमाचे चाैकटीत व्यवसाय करावा, असे ते म्हणाले.

पाटील म्हणाले, व्यंगचित्र माध्यमातून अंमली पदार्थ विराेधी जनजागृती करणे ही अभिनव कल्पना आहे. व्यसनाच्या आहारी न जाण्याचा संकल्प हे चित्र प्रदर्शन पाहून लाेक करतील. अंमली पदार्थाचे प्रमाण शहरात वाढत आहे परंतु 70 लाखांचे पुणे शहर हे वाया गेले असे चित्र रंगवले जात असून ते चुकीचे आहे. पुणे शिक्षणाचे माहेरघर असून अनेक नामांकित शैक्षणिक संस्था, उद्याेग, नावजलेले रुग्णालय पुणे शहरात आहे.

महाविद्यालयांमध्ये समुपदेशकाचे पद निर्माण करणार

अमली पदार्थांच्या व्यसनापासून युवकांनी दूर राहावे यासाठी प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशकाचे एक अतिरिक्त पद (किमान व्हिजिटिंग) निर्माण करण्याचा शासन गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनने कार्टून्स कंबाईनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात पाटील बोलत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. शहरातील प्रथितयश व्यंगचित्रकारांनी ‘पुणेकरांनो, एकत्र येऊन अमली पर्दार्थांच्या विरोधात लढू या’ असा संदेश देणारी व्यंगचित्रे काढली.

पाटील म्हणाले, “अमली पदार्थांचे प्रमाण वाढत चालले आहे आणि ते चिंताजनक आहे. परंतु 70 लाख लोकसंख्येचे शहर हे जवळजवळ कामातून गेले अशी प्रतिमा निर्माण होत आहे. त्यामुळे पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. येथे उद्योगांची संख्या मोठी असून, आरोग्य सेवा उत्तम आहेत. वेगाने विकसित होणारे देशातील आठव्या क्रमांकाचे शहर ही प्रतिमा जगातील व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेले शहर अशी चुकीची होत आहे. त्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, नागरिकांना दक्षता पथकांमध्ये सहभागी करून घेतले पाहिजे, पब संदर्भात नियमावली करून अंमलबजावणीसाठी पुणेकरांनी एकत्र आले पाहिजे, या विषयात कोणीही विषयात राजकारण करू नये.”

निम्हण म्हणाले, “पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात अडकले असल्याचे चित्र निर्माण होत आहे. तरूण पीढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने दीर्घकालीन, व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. आगामी काळात जनजागृती, समुपदेशन, पुनर्वसन, औषधोपचार आणि अमली पदार्थांना हद्दपार करणे असा हा पाच कलमी कार्यक्रम असणार आहे. या मोहीमेच्या बोधचिन्हाचे आज अनावरण करण्यात आले.”

चारूहास पंडित, योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी, अतुल पुरंदरे, धनराज गरड, शरयू फरकांडे, लहू काळे, अश्विनी राणे या व्यंगचित्रकारांनी सहभाग घेतला.उमेश वाघ, अमित मुरकुटे, प्रमोद कांबळे, टिंकू दास, गणेश शिंदे, सचिन मानवतकर, गणेश शेलार, महेंद्र पवार यांनी संयोजन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लवकरच जाहीर होणार गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल

https://www.youtube.com/live/fFVATRwAxP4?si=7g1Z8-YHQWZYClCS एमपीएससीच्या कारभारावर आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत लक्षवेधी मुंबई/ पुणे...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन शिक्षेत वाढ:सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विधेयकाचे झाले काय?

दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 घेतले मागे... मुंबई-सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून...

दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात आमदार महेश लांडगे यांनी मांडली आक्रमक भूमिका

कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांचे सर्वंकष उपाययोजनांचे निर्देश मुंबई/ पिंपरी-चिंचवड...

चाकूर च्या माजी नगराध्यक्षांसह शरद पवार गट, ‘प्रहार’ च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 11 जुलै...