वडील कायमच आपल्या मुलांना सातत्याने प्रेरणा देत असतात. आयुष्यातली आव्हानं कशी हाताळायची यावर त्यांच्याइतके चतुर सल्ले कोणीच देऊ शकत नाही आणि प्रत्येक मूल आपल्या वडिलांच्या सल्ल्याबद्दल आभारी असतं. या फादर्स डे च्या निमित्ताने एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीने मुलांच्या आयुष्यातल्या वडिलांच्या बहुआयामी भूमिकेचा ‘लाइफ मित्रा’ – मित्र, मार्गदर्शक आणि आर्थिक गुरू म्हणून सन्मान करणार असल्याचे जाहीर केले आहे. ही संकल्पना एसबीआय लाइफने कंपनीच्या #PapaHainNa या प्रमुख डिजिटल प्रॉपर्टीअंतर्गत प्रदर्शित केलेल्या डिजिटल फिल्मध्ये संवेदनशील पद्धतीने मांडण्यात आली आहे. या फिल्ममधून आयुष्यातल्या आव्हानांवर मार्ग काढण्यासाठी आपल्या अनुभवांचा वापर करणाऱ्या वडिलांची व्यावहारिक आणि अंतर्ज्ञानी बाजू अधोरेखित करण्यात आली आहे.
या डिजिटल फिल्ममध्ये एसबीआय लाइफचे ब्रँड तत्वज्ञान आणि नोकरदार तसेच पालक म्हणून वडील निभावत असलेल्या दुहेरी भूमिकेवर भर देण्यात आला आहे. लाइफ मित्राला (जीवन विमा सल्लागार) आपलं काम आणि अडचणीच्या वेळी आपल्या मुलाला मार्गदर्शन करताना दाखवून या डिजिटल फिल्मध्ये कशाप्रकारे विमा सल्लागार व्यावसायिक आणि वैयक्तिक आव्हाने तितक्याच सफाईने पार करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
डिजिटल फिल्मचा व्हिडिओ इथे पाहा
या कॅम्पेनविषयी एसबीआय लाइफच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि सीएसआरचे ब्रँड प्रमुख श्री. रवींद्र शर्मा म्हणाले, ‘पारंपरिक जीवन पद्धतीमध्ये वडिलांकडे कुटुंबातील कर्ता माणूस, प्रियजनांच्या गरजा व इच्छा पूर्ण करण्यासाठी अविरत मेहनत करणारी व्यक्ती म्हणून पाहिले गेले आहे. मात्र, ही भूमिका गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रमाणात उंचावली आहे. आज वडील हे कुटुंबातील प्रेरणादायी व्यक्तीबरोबरच कुटुंब व मुलांना आयुष्यातल्या आव्हानांवर मात करणारे विश्वासू मित्र, मार्गदर्शक आणि मुलांची गुपितं जपणारे झाले आहे. अगदी आमच्या लाइफ मित्रासारखे. कारण ते ही आपल्या ग्राहकांच्या गरजांनुसार त्यांना मार्गदर्शन करतात.’ ते पुढे म्हणाले, ‘एसबीआय लाइफच्या ‘लाइफ मित्रां’च्या आपल्या कामाप्रती लक्षणीय बांधिलकीचे आणि मुलांवर अमर्याद प्रेम करण्याचे, त्यांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी चालना देण्याचे, अवघड काळात आशा न सोडण्यासाठी प्रेरणा देण्याचे आम्हाला कौतुक वाटते. एसबीआय लाइफचे #PapaHainNa कॅम्पेन आपल्या मुलांसाठी प्रेरणास्थान असलेल्या, त्यांना पाठिंबा देण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या प्रत्येक वडिलांच्या योगदानाची दखल घेत आहे.’
ही डिजिटल फिल्म क्रिकेट ट्रेनिंग कॅम्पच्या बाहेर असलेल्या एका ज्युस सेंटरच्यापाशी घडते. त्यात ११ वर्षांचा मुलगा चिंटू आणि त्याचे वडील सुरेश माधव जे एसबीआय लाइफ मित्र म्हणजेच विमा सल्लागार असतात, त्यांच्यातला हृदयस्पर्शी संवाद ऐकायला मिळतो. क्रिकेट टीममध्ये निवड न झाल्यानं चिंटू वैतागलेला असतो आणि क्रिकेट सोडून देणार म्हणतो. त्याचे वडील लाइफ मित्रा म्हणून काम करतानाच्या आपल्या अनुभवातून त्याला व्यावसायिक पद्धतीचा पण प्रेमळ सल्ला देऊन या निराशेवर कशी मात करायची सांगतात. त्यातून काम आणि आयुष्याचा समतोल साधताना विकसित झालेली कौशल्यं घर- आयुष्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी कशी उपयोगी ठरतात हे दिसूतं.
सीन क्रिकेट खेळाडूच्या कपड्यात असललेल्या चिंटूपासून सुरू होतो. त्याचे वडील घाईनं तिथं येतात आणि वैतागलेला चिंटू सांगतो, की त्याची क्रिकेट टीममध्ये निवड झालेली नाही. आता आपण हा खेळच सोडून देणार आहे असंही तो सांगतो. वडील त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात, मात्र चिंटू ठाम असतो.