नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांचीआवाजी मतदानाने निवड झाली , मोदींनी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता तर विरोधकांनी मतदानाची मागणी केली होती मात्र ती धुडकावून आवजी मतदानाने ओम बिर्ला यांची निवड घोषित करण्यात आली. प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांनी त्यांना आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांना विजयी घोषित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षनेते राहुल गांधीही नवीन स्पीकर बिर्ला यांना आसनापर्यंत सोडायला गेले.
लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची मागणी मोदी-शहांनी धुडकावून लावली. त्यामुळे इंडिया आघाडीनं अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला होता . त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार के. सुरेश यांनी अर्ज भरला होता . पण भाजपकडून ओम बिर्ला यांनाच पुन्हा संधी देण्यात आलीय. ओम बिर्लांच्या समर्थनार्थ 13 पक्षांनी प्रस्ताव सादर केला . पीएम मोदी हे बिर्लांचे पहिले प्रस्तावक आहेत. अमित शाह, जीतन राम मांझी, चिराग पासवानही प्रस्तावक आहेत. स्वातंत्र्यानंतरची अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची ही तिसरी वेळ होती . मात्प्रर प्क्रिरत्यायक्षात मतदान न घेता आवजी मतदानाने ती पार पाडण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी कुटुंबीयांनी ओम बिर्ला यांचं औक्षण केलं.