‘लिक्विड लिझर लाउंज’ (एल 3) या हॉटेलवरही कारवाई
पुणे-पुणे महापालिकेने भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेच्या चुलत भावाच्या हॉटेलवर पालिकेने हातोडा चालवला आहे. फर्ग्युसन रस्त्यावर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या चुलत भावाचे कल्चर नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलचे अनधिकृत बांधकामावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हातोडा चालवला आहे. तर फर्ग्युसन रस्त्यावरील इतर अनधिकृत हॉटेल आणि बारवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.आज सुमारे 12 ते 15 व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येवुन 9 ते 10 हजार चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली.यामधे हॉटेल वैशाली , शिरोळे मॉल चा काही भाग, कल्चर होटल, इ चा समावेश आहे.लिक्विड लिझर लाउंज’ (एल 3) या हॉटेलवरही कारवाई करण्यात आली .
कल्याणी नगर पोर्शे कार अपघातानंतर शहरातील पब आणि बारवर रात्री बंदी घालण्यात आली होती. तर अनधिकृत बारवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर एफसी रोडवरील एका पबच्या शौचालयात काही तरुण ड्रग्ज चे सेवन करत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. यामुळे पुणे शहरात रात्री उशीरापर्यंत पब, हॉटेल सुरु असल्याचे समोर आले. तसेच त्याठिकाणी ड्रग्जचे सेवन होत असल्याचे व्हिडीओ मिळाले आहेत.
पब मध्ये प्रवेश देण्यापूर्वी वयाची शहानिशा करण्यात यावी. अल्पवयीन मुलांना पब, हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये, तसेच त्यांना मद्य विक्री करण्यात येऊ नये. रात्री दीड नंतर पब सुरु ठेवू नयेत. नागरिकांना त्रास झाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल अशा सूचना पब चालकांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही या आदेशाचे आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचे व्हिडीओमध्ये असलेल्या वेळेवरुन स्पष्ट होत आहे. यानंतर पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईला सुरुवात झाली. त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेने एफसी रस्त्यावरील अनधिकृत हॉटेलवर बुलडोझर कारवाईला सुरुवात केली आहे.

