राशी खन्ना म्हणते की ” तिला प्रभाससोबत काम करायला आवडेल तो उत्तम काम करत आहे आणि ती कल्की 2898 AD’ ची वाट पाहत आहे”
राशी खन्नाची टॉलिवूड मध्ये काम करण्याची इच्छा ! प्रभास आणि महेश बाबूसोबत काम करायचे आहे असं का म्हणते राशी
टॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीत एक दशक पूर्ण करण्याचा पराक्रम गाजवणारी अष्टपैलू पॉवरहाऊस अभिनेत्री राशि खन्ना हिला तिला कोणत्या अभिनेत्यांसोबत काम करायचे आहे याबद्दल विचारण्यात आले. याबद्दल बोलताना राशी खन्ना म्हणते “मला महेश बाबूसोबत काम करायचे आहे. मी हे खूप वेळा सांगितले आहे. मला वाटते की आम्ही पडद्यावर छान दिसू ती पुढे म्हणाली की तिला प्रभाससोबत काम करायला आवडेल आणि तो छान काम करत आहे मला ‘कल्की 2898 एडी’चा ट्रेलर खूप आवडला आणि मी आता या चित्रपटाची वाट पाहत आहे.”
पॅन इंडिया अभिनेत्रीने टॉलिवूडमध्ये पदार्पण करताना तिला तेलुगू अजिबात कसे माहित नव्हते याबद्दल देखील अनेकदा सांगितलं आहे. तिने स्वत: ला एक अभिनेत्री म्हणून स्थापित केले आहे. अभिनेत्रीने अलीकडेच तमिळ चित्रपट ‘अरनमानाई 4’ द्वारे जबरदस्त हिट दिला ज्याने तमिळ बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. राशीचा सलग तिसरा हिट चित्रपट ठरला. एवढेच नाही तर चित्रपटाच्या यशाने तिला तामिळ इंडस्ट्रीची ‘गोल्डन गर्ल’ म्हणून ओळखले जात आहे. कामाच्या आघाडीवर राशि खन्ना तिचा आगामी हिंदी चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे ज्यामध्ये ती विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसेल. ती ‘तलाखों में एक’ मध्येही दिसणार आहे. राशीचा ‘तेलुसू काडा’ नावाचा तेलगू चित्रपटही पाइपलाइनमध्ये आहे.