बी. व्होक, एम. व्होक, एम. टेक, वर्किंग प्रोफेशनल बी. टेक अभ्यासक्रम शिकण्याची संधी – हर्षवर्धन पाटील
पिंपरी, पुणे (दि.२२ जून २०२४) शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विश्वसनीय संस्था म्हणून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने (पीसीईटी) नावलौकिक प्राप्त केला आहे. आजच्या स्पर्धात्मक काळाची गरज ओळखून पीसीईटीने बी. व्होक, एम. व्होक, एम. टेक, वर्किंग प्रोफेशनल बी. टेक आदी अभ्यासक्रमांचे सुरूवात केली असून या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. नवे ‘शैक्षणिक धोरण – २०२०’ नुसार अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग निगडी, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी (पीसीयू) साते, ता. मावळ आदी शैक्षणिक संकुलात हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, अशी माहिती पीसीसीओईचे विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली.
यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, निगडी येथे नवीन शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी) नुसार निर्धारित आणि एआयसीटीई द्वारे मंजूर करण्यात आलेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मॅकेनिकल, कॉम्प्युटर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मधील बी. टेक. फॉर वर्किंग प्रोफेशनल्स पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. नियमित इंजिनिअरिंग पदवी प्रमाणेच ही पदवी असून, शैक्षणिक मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष कार्यानुभव अशी रचना ही कार्यरत असणाऱ्या व्यावसायिक व नोकरदार मंडळींच्या अनुसार आठवड्याच्या शेवटी व सुट्टीच्या दिवशी करण्यात आली आहे.
तसेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी बी. व्होक पदवी अभ्यासक्रम, कन्स्ट्रक्शन ॲण्ड प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इंडस्ट्रीयल रिफ्रेजेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी), लॉजिस्टिक मॅनेजमेंट, मकॅट्रॉनिक्स मेकेट्रोनिक्स इंजीनियरिंग, सोलर सिस्टिम हे अभ्यासक्रम बी. व्होकेशनल साठी उपलब्ध आहेत.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट द्वारे संचालित स्वायत्त विद्यापीठ असलेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठ, (पीसीयू) साते, वडगाव मावळ येथे एम. व्होक आणि बी. व्होक साठी प्रवेश देणे सुरू आहे. त्यामध्ये कॉमर्स ॲण्ड मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, एच.आर. ॲण्ड ऑफिस मॅनेजमेंट, एच.आर. ॲण्ड हॉस्पिटल ॲण्ड हेल्थकेअर मॅनेजमेंट, सेल्स ॲण्ड मार्केटिंग, ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच कॉर्पोरेट वर्किंग प्रोफेशनलसाठी कॉर्पोरेट एम. टेक अभ्यासक्रम कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजीनियरिंग अर्थात (एआय) मध्ये उपलब्ध आहे, असे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.
१९९० पासून, एक विश्वसनीय शैक्षणिक ब्रँड म्हणून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट नावाजले आहे. सर्वोत्तम शैक्षणिक दर्जा, उत्तम कॅम्पस प्लेसमेंट ही पीसीईटीची सुरुवातीपासूनच ओळख राहिली आहे. पीसीईटी मध्ये के. जी. टू पी. जी. असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आज जगभरातील अनेक देशांमध्ये पीसीईटीचे विद्यार्थी काम करत आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आम्ही काही नवीन अभ्यासक्रम देखील सुरू करीत आहोत. त्याचा फायदा निश्चितपणे बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना होणार आहे आणि त्यातून त्यांचा कौशल्य विकसित होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी मधील प्रवेशांसाठी www.PCU.edu.in तर पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी www.PCCOEpune.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.