पुणे:
पुणतांबा ते कान्हेगाव दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने येत्या दि. २३ ते ३० जूनदरम्यान काही रेल्वे रद्द केल्या आहेत. २८ जूनला पुणे-मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) इंटरसिटी एक्स्प्रेस, २९ आणि ३० जूनला पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस तसेच इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.२९ जूनला मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस तसेच इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ३० जून रोजी पुणे-मुंबई; तसेच मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. या दिवशी मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसही रद्द राहणार आहे.
२३ जून रोजी पुणे-जबलपूर स्पेशल आणि २४ जून रोजी परतीची जबलपूर-पुणे स्पेशल रद्द करण्यात आली आहे. २६ जून रोजी वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन स्पेशल-पुणे आणि परतीची २७ जून रोजीची पुणे-वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन स्पेशल एक्स्प्रेस रद्द राहणार आहे.
२८ जून रोजी दादर साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, २९ आणि ३० जून रोजी मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस, दादर-साईनगर शिर्डी (१२१३१/३२) एक्स्प्रेस, दादर- साईनगर शिर्डी (११०४१/४२) एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत

