Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

धानोरीच्या अक्षय राजु नवगिरे,आकाश शिवशंकर विश्वकर्मावर मकोका ची कारवाई

Date:

पुणे-खूनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे, दहशत पसरवणे असे गुन्हे केल्याबद्दल अक्षय राजु नवगिरे(टोळी प्रमुख) व त्याचा एक साथीदार याचेवर मकोका अंतर्गत कारवाईकरण्यात आल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांनी दिली आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दि.१९/११/२०२३ रोजी बिकानेर स्वीट समोर, तसेच नारायण मोझे शाळेसमोर, मुंजबा वस्तीपुणे या ठिकाणी यातील फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ हे जेवण झाल्यानंतर फेरफटका मारुन गप्पा मारत थांबले असताना, अक्षय नवगिरे व आकाश विश्वकर्मा यांनी दुचाकीवरुन येऊन फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ यास शिवीगाळ व दमदाटी करुन अक्षय नवगिरे याने त्याचे हातातील कोयता फिरवुन तेथे दहशत निर्माण करुन फिर्यादी व त्यांचे भावास कंबरेच्या पटयाने व हातातील जाड कड्याने, लाथा-बुक्यांनी मारहाण करुन, चुलत भाऊ याचे डोक्यात कडे मारुन गंभीर जखमी करून, पोलिसांत तक्रार केली तर तुमचे काही खरे नाही अशी धमकी दिली म्हणुन फिर्यादी यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं.३४३/२०२३ भा. द. वि.क. ३२६,३२३,५०४, ५०६,३४, आर्म अॅक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याचे तपासा दरम्यान यातील आरोपी नामे १) अक्षय राजु नवगिरे, वय-२५ वर्षे, रा. गोकुळ नगर, मनपा शाळेजवळ, धानोरी, पुणे (टोळी प्रमुख) २) आकाश शिवशंकर विश्वकर्मा, वय-२१ वर्षे, रा. परांडे नगर, धानोरी, पुणे (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदर नमुद आरोपी नामे अक्षय राजु नवगिरे (टोळी प्रमुख) याची पूर्व रेकॉर्डची पाहणी करता, त्याचेवर विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल असुन, त्याने त्याचे साथीदारासह स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्यासाठी विश्रांतवाडी, येरवडा, विमानतळ पोलीस स्टेशन परीसरात खूनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
यातील आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचे हेतुने व इतर फायदयासाठी सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आलेने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) प्रमाणेचा अंतर्भाव करणेसाठी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. दत्तात्रय भापकर यांनी मा. पोलीस उप आयुक्त परी-०४, पुणे, श्री. शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने . अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रकरणी छाननी करुन विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं.३४३/२०२३, भा.द.वि.क. ३२६, ३२३,५०४,५०६,३४, आर्म अॅक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) (३) सह१३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेट कलम ३ व ७ या दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३(४) प्रमाणेचा अंतर्भाव करणेची अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ पुणे शशिकांत बोराटे, सहा पोलीस आयुक्त, खडकी विभाग श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे, पोलीस उप निरीक्षक शुभांगी मगदुम व सत्यवाण गेंड सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार मनोज शिंदे, सुनिल हसबे, यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून, शरीराविरुध्द व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ९३ वी कारवाई आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...