Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महिंद्रातर्फे क्रांतीकारी6ROपॅडी वॉकर ट्रान्सप्लँटर महाराष्ट्रात लाँच करत भात लावणी क्षेत्रात नवे मापदंड

Date:

·        दमदार आणि कार्यक्षम इंजिन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भात लावणीची कार्यक्षमता वाढवणार

·        महिंद्राच्या शेती उपकरणे वितरकांच्या विस्तृत नेटवर्कमध्ये उपलब्ध, महिंद्रा फायनान्स, श्रीराम फायनान्स आणि आघाडीच्या वित्त संस्थांतर्फे ७५ टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठ्याची सोय

·        महिंद्राच्या नव्या साथी अ‍ॅपद्वारे घरबसल्या सर्व्हिसिंगवर देखरेखीची सोय

पुणे17 जून २०२४ – महिंद्रा अँड महिंद्रा इक्विपमेंट सेक्टर (एफईएस) या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या आणि आकडेवारीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक असलेल्या कंपनीने राज्यात महिंद्रा 6RO पॅडी वॉकर नावाचे भातलावणीसाठी सहा रांगांचे ट्रान्सप्लँटर लाँच केले आहे.

महाराष्ट्रात 4RO वॉक बिहाइंड ट्रान्सप्लँटर (एमपी४६१) आणि 4RO राइड- ऑन (प्लँटिंग मास्टर पॅडी 4RO) यशस्वीपणे लाँच केल्यानंतर महिंद्राचे नवे 6RO पॅडी वॉकर भात लावणी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे आघाडीचे स्थान आणखी मजबूत करेल. महाराष्ट्रात भात हे प्रमुख पिकांपैकी एक असून राज्य भाताच्या विविध जातींसाठी प्रसिद्ध आहे. भात लावणीसाठी यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या पहिल्या काही राज्यांमध्येही महाराष्ट्राचा समावेश होतो. राज्याच्या विविध भागांत दर्जेदार भात पिकवला जातो. नवीन उपकरणामुळे पाण्याचे संवर्धन होईलपर्यावरणावर कमी परिणाम होईल व त्याचप्रमाणे मनुष्यबळाची गरज असणाऱ्या इतर उपकरणांच्या तुलनेत मनुष्यबळावर होणारा खर्चही कमी होईल. सोबत भातशेतीशी संबंधित एकंदर नफ्यातही वाढ होईल.

नवीन महिंद्रा 6RO पॅडी वॉकरद्वारे दर्जेदार ऑपरेटर कार्यक्षमता पुरवली जाते व ते अचूक व कार्यक्षम रोपलावणीच्या हेतूने तयार करण्यात आले आहे. हे उपकरण भात लावणी क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करेल. मॅन्युअली वापरता येणाऱ्या नव्या ट्रान्सप्लँटरचे डिझाइन आटोपशीर असून ते लहान जागेत फिरवण्यासाठी सोपे आहे. त्यामुळे एकाच पासमध्ये एकाच वेळी सहा रांगांमध्ये एकसमान पद्धतीने रोपे लावता येतात. ताकदटिकाऊपणा आणि कामगिरी यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या नव्या पॅडी ट्रान्सप्लँटरमध्ये दीर्घकाळ टिकण्याची क्षमता असलेला गियरबॉक्स आणि ४ लीटर क्षमतेचे दमदार इंजिन बसवण्यात आले आहे. यामुळे चांगले उत्पादन मिळतेकमी इंधन वापरले जाते आणि भातलावणीची उत्पादनक्षमता वाढते व दोन सर्व्हिसिंगमधला कालावधी वाढतो.

परतफेडीसाठी २ वर्षांचा कालावधी आणि ऑपरेटिंगसाठी फक्त २०० एकर्सचा किमान परिसर यांसह हे राइस प्लँटर भाडेशुल्कावर देण्याच्या व्यवसायासाठीही चांगले आहे. महिंद्राच्या महाराष्ट्रातील शेती यंत्रणा वितरकांच्या विस्तारित नेटवर्कद्वारे हे उपकरण उपलब्ध आहे. त्याशिवाय नव्यायुजर फ्रेंडली महिंद्रा साथी अ‍ॅपद्वारे त्याचे तत्काळ घरबसल्या सर्व्हिसिंगवर देखरेख करता येऊ शकते. नवीन महिंद्रा 6RO पॅडी वॉकर तसेच भात लावणीसाठीची महिंद्राची संपूर्ण श्रेणी महिंद्रा फायनान्स व श्रीराम फायनान्सच्या सर्वोत्तम वित्त पर्यायांसह उपलब्ध करण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...