नीट परीक्षा गैरव्यवहाराची न्यायालयीन चाैकशीच हाेणे गरजेचे:काँग्रेसचे प्रवक्ते गाेपाळ तिवारी यांची मागणी

Date:

पुणे-नीट प्रवेश परीक्षा अायाेजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या प्रमुख प्रा.प्रदीपकुमार जाेशी हे स्वत:च्याच अखत्यारीतील अनियमिततेच्या अाराेपांची चाैकशी करण्याचे काम नेमके कसे पारदर्शकपणे करु शकणार अाहे असा संतप्त प्रश्न उपस्थ‌ित करत काँग्रेस प्रवक्ते गाेपाळ तिवारी यांनी नीट परीक्षा गैरव्यवहाराची न्यायालयीन चाैकशीच हाेणे गरजेचे अाहे असे मत पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.

तिवारी म्हणाले. वैद्यकीय क्षेत्र हे नागरी जीवन अाराेग्या विषयी काळजी घेणारे अाहे. जीवनात महत्वकांक्षी लक्ष्य प्राप्त करु पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अायुर्वेदकीय, दंतकीय, हाेमिअाेपॅथी अशा पदवी -पदवीत्ताेर शिक्षणाकरिता केंद्र सरकार तर्फे अायाेजीत ‘नीट’ प्रवेश पात्रता परीक्षा देणे बंधनकारक अाहे. मात्र, या प्रवेश पात्रता परीक्षेत पेपर फुटीचे, हेराफेरीचे व गैरव्यवहाराचे प्रकार घडले अाहे. केंद्र सरकारतर्फे घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार उघडकीस येऊ नये याकरिता निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान अचानक संशयास्पदरित्या निकाल जाहीर केले गेले.

केंद्र सरकारने प्रवेश पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराची पारदर्शकपणे चाैकशी करणे गरजेचे असताना, त्यांनी चाैकशीच्या नावाखाली युपीएससीचे माेदी काळातील माजी संचालक प्रा.प्रदीपकुमार जाेशी यांची चाैकशी समिती गठित केली. परंतु प्रदिपकुमार जाेशी हे नीट परीक्षा अायाेजित करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचे प्रमुख असल्याने सदर परीक्षा व्यवस्थापन बघणाऱ्या प्रमुखाकडूनच निष्पक्ष व न्याय चाैकशी कशी हाेऊ शकेल? याप्रकरणात केंद्र सरकारतर्फे सर्वाच्च न्यायालयात जी उत्तरे दिली गेली त्यात एक हजार ५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्याचे सांगत सदर गुण परत घेऊन तेवढयाच विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे धक्कादायक व हास्यास्पद विधान केले अाहे.

हरियाणात एकाच केंद्रात सात विद्यार्थ्यांना सर्वाच्च समान मार्क्स मिळाल्याची बाब समाेर अाली अाहे. तसेच काही लाख रुपये देण्याची तयारी ठेवा व प्रश्नपत्रिका मिळावा असे खाजगी काेंचिंक क्लासेस चालवणाऱ्यांचे व्हिडिअाे देखील पुढे अाले अाहे. त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी व जनतेच्या जीवाशी चालणारा हा खेळ निंदनीय अाहे. उच्च किंवा सर्वाच्च न्यायालयाने याची सुमाेटाे चाैकशी करावी अशी अामची मागणी असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ४४ व्या फळे, फुले आणि भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त, उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या...

टाटा एआयएने आणले ‘एन्हान्स्ड व्हॅल्यू इंडेक्स फंड्स’

प्रियजनांची सुरक्षा आणि भविष्यातील प्रगती: गुंतवणुकीचा सर्वात स्मार्ट मार्ग हा...

रौप्य महोत्सवी ब्रह्मनाद संगीत महोत्सव दि. २० फेब्रुवारीपासून

धायरीत आयोजन : पंडित सत्यशील देशपांडे यांना ब्रह्मनाद पुरस्कार पुणे...

इन्फिस्को शेअर मार्केट कंपनीच्या भुपेश अशोक दिक्षीतवर गुन्हा दाखल

पुणे- कोरेगाव पार्क येथील इन्फिस्को शेअर मार्केट...