पुणे- स्वातंत्र्यासाठी आणि स्वराज्यासाठी आयुष्य वेचलेले ,विचार दिलेले , लढा दिलेले असे थोर महापुरुष आता हयात नसतानाही , आपल्या स्मारकांना पोलिसांच्या संरक्षण विळख्यात जखडलेले पाहतील कि काय ? असे दिवस आता येऊ शकणार आहेत .होय .. त्यांच्या हयातीनंतरही काही समाज कंटक त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत, काही राजकीय हेतूने तर काही माथेफिरू झाल्याने .. पण हि उपेक्षा आता थोर महापुरुषांचा स्मारकांची होणार आहे त्यांना मोकळा श्वास घेणेही अवघडच जणू होणार आहे कि काय ? असे वाटू लागले आहे. त्याला निमित्तही समोर आले आहे.
शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारके, सामाजिक, राजकीय नेत्यांचे पुतळे अशा ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात यावे, तसेच प्रत्येक ठिकाणी २४ तास पोलिस कर्मचारी तैनात करण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि,’ महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना झाली म्हणून समाजात तणाव निर्माण झाल्याच्या, जातीय दंगली झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी महाराष्ट्रात घडल्या आहेत. दिनांक १३ जून २०२४ रोजी हडपसर येथे एका मनोरुग्णाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दगड फेकून मारल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. सुदैवाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, परंतू भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात पक्षाच्या वतीने महानगरपालिका आयुक्तराजेंद्र भोसले यांना निवेदन सादर करण्यात आले.
शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारके, सामाजिक, राजकीय नेत्यांचे पुतळे अशा ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात यावे, तसेच प्रत्येक ठिकाणी २४ तास पोलिस कर्मचारी तैनात करण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

