Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खड्ड्यात पुणे, पाण्यात पुणे अन अपघातात पुणे ..महायुतीचे नेते मात्र जल्लोषात रममाण

Date:

पुणे-बिबवेवाडी येथील गंगाधाम सोसायटी परिसरात काल एका मद्यधुंद डंपर चालकाने एका ज्येष्ठ महिलेला चिरडल्याची अतिशय दुःखद घटना घडली. यानंतर प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
प्रत्यक्षात अवजड वाहनांना दिवसा शहरात बंदी असताना काही बिल्डर आणि मालवाहतूक करणारे ठेकेदार यांच्याकडून मिळणाऱ्या पैशासाठी सर्व नियमांचे उल्लंघन करून रोज हजारो अवजड वाहने शहरात फिरत आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
शासन व प्रशासनाच्या या गलथान कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गांगाधाम येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह नितीन कदम, संजय दामोदरे, मृणालताई वाणी, स्वातीताई पोकळे, रुपालीताई बिबवे, लखन वाघमारे, शशिकांत तापकीर, समीर पवार, मंगेश चव्हाण, बाळासाहेव अटल, सचिन पासलकर तसेच बहूसंखेने पदाधिकारी वा कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी एक अपघात … चांदणी चौकात

पुणे शहरातील मार्केटयार्ड परिसरात डंपर चालकाने महिलेला चिरडल्‍याची घटना ताजी असतानाच गुरूवारी चांदणी चौकात मालवाहतूक करणाऱ्या एसटी चालकाचे नियंत्रण सुटुन भीषण अपघात झाला. त्‍याने मिस्‍कर वाहन चालकाला धडक दिल्‍यामुळे तिघेजण गंभीररित्‍या जखमी झाले. त्‍यामध्ये एका तरूणाची प्रकृती चिंताजनक असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा अपघात गुरुवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघातात प्रफुल्‍ल नागपुरे, प्रसाद साळुंखे आणि कविता साठे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाची कार्गो बस हिंजवडीहून कोथरूडच्या दिशेने येत होती त्यावेळेस चांदणी चौकातून खाली उतरत असताना बस चालकाचे अचानकपणे नियंत्रण सुटल्याने बस मिक्सर वाहनाला धडकली. त्यामुळे दोन्ही वाहने दुभाजक तोडून दुसऱ्या लेन वरती गेली. एसटीने मिक्सर वाहनाला धडक दिल्यामुळे वळण दुसरीकडे घेतले आणि समोरून जाणाऱ्या दुचाकीला दोन दुचाकींना एसटीने जोरदार धडक दिली.

अपघातात एक दुचाकी एसटीच्या चाकाखाली आली तर दुसरी दुचाकी दुभाजकाला जाऊन आदळली. परिणामतः या अपघातात तिघेजण गंभीरित्या जखमी झाले आहे. त्यातील एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरी तर दुसऱ्या दोघांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्‍त महिला भुगाव येथून कोथरूडकडे निघाली होती. तर दुसऱ्या दुचाकी वरील तरुण मुळचा गोंदीया येथील रहिवासी असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली असून तोही कोथरूडच्या दिशेने मार्गस्थ होत होता. मात्र त्याच वेळी भरधाव एसटी कार्गो बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उतारावरून गाडी दुसऱ्याच लेनवर गेली आणि हा भिषण अपघात झाला. अपघातामुळे बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कोथरूड पोलीस वाहतूक पोलीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्‍यांनी काही वेळातच परिसरातील वाहतूक सुरळीत केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...