सुनेत्रा पवारांचा राज्यसभेचा अर्ज दाखल:प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही, पण पक्षाचे निर्णय मान्य करावे लागतात – छगन भुजबळ

Date:

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. राज्यसभेच्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र पक्षाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, पक्षाचे निर्णय मान्य करावे लागतात असे, मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो. मीसुद्धा राज्यसभा लढण्यासाठी इच्छुक होतो. पण सुनेत्रा पवारांना उमेदवारा देण्याचा निर्णय झाला. पक्षात चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेला. माझ्या तोंडावर दिसतंय का नाराज आहे? मी नाराज नाहीय, पक्षात सर्वांनी मिळून निर्णय घ्यायचे असतात.

बिनविरोध निवडणूक होईल

छगन भुजबळ यांनी म्हणाले की, या जागेसाठी माझ्यासह आनंद परांजपे हे देखील इच्छुक होते. मात्र आमच्या पक्षातील कोअर कमिटीच्या आम्ही सर्व सदस्यांनी मिळून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याविषयी निर्णय घेतला. यामध्ये अजितदादांचा काहीही संबंध नाही. एक जागा असल्यामुळे इच्छुक असलेल्या सर्वांनाच उमेदवारी देणे शक्य नव्हते. राज्यात महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात असल्याने आमची ही जागा सहज निवडून येईल. त्यामुळे महाविकास आघाडी उमेदवार देणार नाही, असे मला वाटते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात भाजपच्या कॉंग्रेसभवन वरील हल्लाबोल आंदोलनासमयी दगडफेक: कार्यकर्त्यांसह पोलिस अन् पत्रकारही जखमी

पुणे-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती...

फडणवीसांनी शहाणपणा शिकवू नये – सपकाळ

मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी शहाणपणा शिकवू नये अशा...

टिपू सुलतान श्रीरामाचे नाव असणारी अंगठी घालत होता:भाजपचे पूर्वी टिपूवर प्रेम होते, आता तो त्यांच्यासाठी वाईट झाला – काँग्रेसचा दावा

मुंबई-काँग्रेसने टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याच्या मुद्यावरून...

पाकिस्तान टिपू सुलतानाला नायक मानतो, मग त्यांच्याशी क्रिकेट खेळता कसे?:राष्ट्रभक्ती की ढोंग?

मुंबई- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट...