Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जड वाहनबंदी रस्त्यांवर जड वाहनांचे असे अपघात झाले तर पोलिसांवरही कारवाई करू -खासदार मेधा कुलकर्णी

Date:

गंगाधाम चौकातील भयाण अपघाताने खासदार कुलकर्णी संतप्त

पुणे- गंगाधाम चौकातील अपघातात एका महिलेचा ज्या पद्धतीने भयाण स्वरूपात बळी गेला त्यामुळे जनमानसात तीव्र भावना उमटत असून खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील तीव्र दुखः आणि संताप देखील व्यक्त केला आहे. जर जड वाहनांना बंदी असलेल्या रस्त्यांवर असे अपघात जड वाहनाचे झाले तर संबधित परिसरातील पोलिसांना देखील जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान या संदर्भात त्यांनी असे म्हटले आहे कि,’दिवसा जड वाहनांना बंदी असलेल्या रस्त्यांवर नियमांचे काटेकोर पालन करण्याची आग्रही मागणी पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.शहराच्या विविध महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत असताना त्यातील एक उपाययोजना म्हणून बाहेरून येणाऱ्या जड वाहनांना, मालवाहतुकीच्या ट्रकला शहराच्या मुख्य रस्त्यांवर दिवसा येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु शहराच्या विविध ठिकाणी सर्रास ही वाहने फिरताना दिसतात.
आज गंगाधाम चौकात झालेला अपघात हा अशाच प्रकारच्या प्रतिबंध असलेल्या रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे झाला आणि एका भगिनीला आपला जीव गमवावा लागला. अक्षरशः काही कळायच्या आत या भगिनीचे डोके धडावेगळे झाले. इतका भयानक हा अपघात होता. या रस्त्यावर बांधकामाच्या अनेक साइट्स चालू असून येथे दिवसा जड वाहने येत असतात.
सदर अपघाताच्या संदर्भात वाहन चालकाला शिक्षा करण्याबरोबरच वाहतूक पोलीस अधिकारी यांनाही जबाबदार धरून नियमांचे काटेकोर पालन न केल्याबद्दल तसेच बेजबाबदार वर्तनाबद्दल त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी आणि त्यांना कार्यमुक्त करावे अशा प्रकारची मागणी केली आहे.

बुधवारी (१२ जून) दुपारी साडे बाराच्या सुमारासमार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात भीषण अपघात झाला आहे. एका महिलेला भरधाव ट्रकने चिरडले. (Market Yard Accident)या भागात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. या रस्त्यावर जड वाहनांना बंदी आहे. तरी देखील बिनदिक्कत बांधकाम व्यावसायिकांचे हे ट्रक, मिक्सर तीव्र उतारावरुन ये जा करीत असतात. वाहतूक पोलिसांकडून याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले जाते. कारवाई करण्याचा प्रयत्न केलाच तर राजकारणी आणि लोकप्रतिनिधींकडून पोलिसांवर दबाव टाकला जातो. या अनास्थेने आज एका महिलेचा बळी घेतला. अक्षरशः काही कळायच्या आत या भगिनीचे डोके धडावेगळे झाले.

सकाळी सात ते रात्री नऊ या कालावधीमध्ये पुणे शहरांमध्ये जड वाहतुकीला बंदी ची कठोर अंमलबजावणी करा यासाठी राष्ट्रवादी अर्बन सेलने सातत्याने आवाज उठवलेला आहे.. दुर्दैवाने पोलिसांनी याकडे नेहमीच कानाडोळा केलेला आहे.
पोलीस अजून किती पुणेकरांच्या जीव जाण्याची वाट बघणार आहे..??

नितीन कदम
अध्यक्ष, अर्बन सेल पुणे शहर

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सदाशिव पेठेत रमेश डाईंग येथे टेरेसवर आग:परिसरात धुराचे साम्राज्य: वाहतुकीचा बट्ट्याबोळ

अग्निशमन दलाकडून चार अग्निशमन वाहने दाखल. आग विझवण्याचे काम...

शांतता पुणेकर वाचत आहेत मध्ये उद्यम विकास सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग

नागरिकांनी रोज रात्री झोपताना काहीतरी वाचण्याची सवय लावावी -...

महाराष्ट्रात थंडी वाढणार,पुढील 48 तास धोक्याचे

मुंबई- महाराष्ट्रात मुंबईसह उपनगरात गारठा वाढू लागला आहे. दुसरीकडे,...

राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे (CPA) ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचा भव्य शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; विद्यार्थ्यांना राष्ट्रीय...