Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत रायगड रॉयल्सचा पहिला विजय

Date:

  • मेहुल पटेल(८३धावा), सिद्धेश वीर(७६धावा)संघाच्या विजयाचे शिल्पकार 

पुणे, ६जून २०२४: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत पाचव्या दिवशी पहिल्या लढतीत मेहुल पटेल(८३धावा) व सिद्धेश वीर(नाबाद ७६धावा) यांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने ४ एस पुणेरी बाप्पा संघाचा ७० धावांनी पराभव करत पहिला विजय मिळवला.    

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सिद्धेश वीर व विशांत मोरे या सलामी जोडीने ४१ चेंडूत ५१ धावांची सलामी दिली. विशांत मोरे १९ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर मेहुल पटेलने सिद्धेश वीरच्या साथीत शतकी भागीदारी करताना संघाच्या डावाला आकार दिला. मेहुलने ३३चेंडूत ८३ धावांची तुफानी खेळी केली. त्यात त्याने ६चौकार व ७ षटकार ठोकत मैदान दणाणून सोडले. सिद्धेश वीरने ५४चेंडूत ८चौकार व १ षटकाराच्या मदतीने नाबाद ७६धावांची संयमी खेळी करत साथ दिली.  
सिद्धेश वीरने मेहुल पटेलच्या समवेत दुसऱ्या विकेटसाठी ५६ चेंडूत १२२ धावांची भागीदारी करून संघाची स्थिती अधिक भक्कम केली. ही भागीदारी एमपीएलमधील या मौसमातील सर्वोच्च भागीदारी ठरली. विशेष म्हणजे मेहुलने पियुश साळवीच्या १८व्या षटकात २९ धावा चोपल्या. यात ३षटकार व २ चौकारांचा समावेश होता. रायगड रॉयल्स संघाने २० षटकात ४बाद १९९धावांचे आव्हान उभे केले. 
१९९ धावांचा पाठलाग करताना पुणेरी बाप्पा संघाला निर्धारित षटकात बाद धावाच करता आल्या. सलामीचे फलंदाज पवन शहा(११धावा), शुभम तैस्वाल(६धावा) हे स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर रोहन दामले(२४धावा) व यश क्षीरसागर(२०धावा)यांनी थोडासा प्रतिकार केला. विकी ओस्तवालने दोघांना बाद करून पुणेरी बाप्पा संघाला अडचणीत टाकले. ऋतुराज गायकवाडने २८चेंडूत २चौकार व ३षटकारासह ३६धावांची लढत अपुरी ठरली.रायगड रॉयल्सकडून तनय संघवीने २४धावात ३गडी बाद केले. त्याला निखिल कदम(२-१७), विकी ओस्तवाल(२-२२)ने दोन गडी, सुनील यादव(१-४१)ने एक गडी बाद करून चांगली  साथ दिली. 
संक्षिप्त धावफलक:रायगड रॉयल्स: २०षटकात ४बाद १९९धावा(मेहुल पटेल ८३(३३,६x४,७x६), सिद्धेश वीर नाबाद ७६(५४,८x४,१x६), विशांत मोरे १९, नौशाद शेख १३, रामकृष्ण घोष २-४,  यश क्षीरसागर १-१४) वि.४एस पुणेरी बाप्पा: २०षटकात ८बाद (ऋतुराज गायकवाड ३६(२८,२x४,३x६), रोहन दामले २४, यश क्षीरसागर २०, सचिन भोसले नाबाद २०, तनय संघवी ३-२४, निखिल कदम २-१७, विकी ओस्तवाल २-२२, सुनील यादव १-४१); सामनावीर – 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...