बालुफ ऑटोमेशन प्लेअर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

Date:

निशाद लेले व नैशा रेवसकर
यांना एकेरीचे विजेतेपद

पुणे—
बालुफ ऑटोमेशन प्लेअर्स चषक द्वितीय जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पाचवा मानांकित निशाद लेले व अग्र मानांकित नैशा रेवसकर यांनी अनुक्रमे पंधरा वर्षाखालील मुले व मुली या गटात विजेतेपद पटकाविले.

एक्स टेबल टेनिस प्लेअर्सतर्फे पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे सुरू आहे.‌ त्यास बालुफ ऑटोमेशन या जर्मन कंपनीचे प्रायोजकत्व लाभले आहे. मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटातील अंतिम सामन्यात पाचवा मानांकित निशाद याने द्वितीय मानांकित आदित्य सामंत याच्यावर आश्चर्यजनक विजय नोंदविला. हा सामना त्याने ६-११,११-२,६-११, ११-४,११-७ असा जिंकताना टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ केला. तो सन्मय परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. उपांत्य फेरीत लेले याने अनुज फुलसुंदर याचे आव्हान ७-११, १३-११,१२-१०,११-७ असे संपुष्टात आणले होते‌. द्वितीय मानांकित सामंत याने तृतीय मानांकित नील नवरे याला ११-८,६-११, ३-११, ११-७,११-७ असे पराभूत केले.

मुलींच्या पंधरा वर्षाखालील गटात नैशा रेवसकरला विजेतेपद मिळवताना संघर्ष करावा लागला. तिने चुरशीच्या सामन्यात वेदांगी जुमडे हिला ११-२,११-९,१२-१० असे पराभूत केले. तिने आपल्या अव्वल मानांकनास साजेसा खेळ करीत अष्टपैलू कौशल्य दाखविले. नैशा ही एम्स अकादमीत नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

खुल्या गटाच्या दुहेरीत नील मुळ्ये व ईशान खांडेकर ही जोडी विजेती ठरली. उत्कंठा पूर्ण झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी शुभंकर रानडे व वैभव दहिभाते यांचा ११-७,८-११,१४-१२, ११-९ असा पराभव केला. दोन्ही जोड्यांनी शेवटपर्यंत आक्रमक खेळ करीत प्रेक्षकांची मने जिंकली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रसिद्धीच्या मागे न लागता आधी सिद्धी प्राप्त करा : पंडित व्यंकटेशकुमार

युवा संगीत साधकांना पंडित प्रल्हादबुवा जोशी स्मृती शिष्यवृत्ती प्रदान पुणे...

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि.२६ :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रीपल...

 इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांना ‘शिवतेज पुरस्कार’

 समस्त हिंदू आघाडीच्या वतीने सन्मान सोहळा; २२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत...

अवैध व अनैतिक धंद्यांची बजबजपुरी, खरात व मंत्री झिरवाळांच्या प्रकरणाने सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर : हर्षवर्धन सपकाळ.

रुपाली चाकणकर व झिरवाळांच्या प्रकरणानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गप्प...