Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तेर एनव्हायरोथॉन २०२४’मध्ये ७०० हून अधिक पर्यावरण प्रेमींचा सहभाग

Date:

पर्यावरण जागृतीसाठी धावले आबालवृद्ध पुणेकर !

पुणे :

‘तेर पॉलिसी सेंटर’ या पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या संस्थेच्या वतीने रविवार,दि.२ जून २०२४ रोजी पहाटे पाच ते सकाळी दहा या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘तेर एनव्हायरोथॉन २०२४’ या जनजागृती दौडला चांगला प्रतिसाद मिळाला.सर्व वयोगटातील ७०० हुन अधिक पर्यावरणप्रेमी पुणेकरांनी उत्साहाने भाग घेतला.टाटा ब्ल्यू स्कोप स्टिल्स यांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व स्तरावर लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा पार पडली.

जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे,डॉ.विनिता आपटे यांच्यासह टाटा ब्लुस्कॉप स्टीलचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.डॉ राम भोज,महादेव कासगवडे,रविन वाडेकर,शिक्षा मिश्रा,मेजर हिमानी,चेतन बालवडकर,रोहन खावटे,महेश कावडकर,विजय कुमार, विवेक कुमार, दीपक मलकानी हे मान्यवर उपस्थित होते.खुशबू अरोरा यांनी सूत्र संचालन केले.’तेर पॉलिसी सेंटर’ ही संस्था जंगलनिर्मितीसाठी विशेष प्रयत्नशील आहे.आजवर संस्थेच्या माध्यमातून ४ लाख झाडे भारतात लावून जगवली आहेत.दरवर्षी त्यात वाढ होते.त्यामुळे जितके स्पर्धक सहभागी होतात,त्यासंख्येइतकी आणखी झाडे त्या हंगामात लावून जागवली जाणार आहेत,हे या एनव्हायरोथॉनचे वैशिष्ट्य आहे’,असे संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ.विनिता आपटे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

या उपक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष होते.जागतिक पर्यावरण दिवस ५ जूनला साजरा केला जातो, त्यानिमित्ताने त्याआधीचा सुटीचा वार निवडून रविवार २ जून २०२४ रोजी हा उपक्रम आयोजित केला गेला.गेली दोन वर्ष या मॅरेथॉनमध्ये विलो इंडिया,टाटा मोटर्स,टाटा ऑटो कॉम या कंपन्यांसह राज्यातील विविध भागातून सुमारे २ हजार पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झालेले आहेत.मॅरेथॉन ३,५ आणि १० किलोमीटर अशा स्वरूपात होती,त्यामध्ये १२ ते १८ वर्षे,१९ ते ४० वर्षे,४१ ते ५५ आणि ५६ वर्षे व त्या पुढे अशा विविध वयोगटानुसार सहभाग नोंदला गेला.

जागृती आणि संवर्धनासाठी योगदान

‘तेर पॉलिसी सेंटर ही संस्था जंगल वाढविणे , विहिरींचे पुनरुज्जीवन करणे , पर्यावरण शिक्षण व पर्यावरण जागृती साठी प्रयत्नशील असणारी संस्था आहे . संस्थेने आजपर्यंत पुण्यासह महाराष्ट्र ,गुजराथ ,कर्नाटक ,आसाम ,भुवनेश्वर ,गोवा ,राजस्थान इथे विविध ठिकाणी ४ लाखापेक्षा जास्त वृक्ष लावून त्यांची जोपासना केली आहे . संस्थेच्या सर्वच उपक्रमांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो ,कॉर्पोरेट कंपन्या मदत करतात त्यामुळे कामाचा उत्साह वाढतो’ ,असे डॉ .विनिता आपटे यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...