दाेन दशकांनंतर भरली शाळा; खडकाळात फुलवले मैत्रीचे रानमाळ

Date:

श्री लक्ष्मी विद्यालय व काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे २२ वर्षांनंतर स्नेहसंमेलन
खळकाळात केले वृक्षाराेपण; सामाजिक कार्य ठरतेय काैतुकास्पद

कागल:
काेल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या श्री लक्ष्मी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज हसुरच्या पटागंणात मस्ती करता करता यशाेशिखर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकीसाठीची धडपड लक्षवेधी ठरली. येथील २००२ दहावी व २००४ बारावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची दाेन दशकांनंतर पुन्हा एकदा शाळा भरली. माजी विद्यार्थी प्रवीण घुगरे यांच्या पुढाकाराने २२ वर्षांच्या विरहानंतरची ही भेट काैतुकास्पद कार्याने सत्कर्मी लागली. या दाेन्ही बॅचच्या विद्यार्थ्यांनी उत्फुर्तपणे पुढाकार घेत हसुरच्या माळरानावर फुलत असलेल्या ऑक्सिजन पार्क मध्ये वृक्षारोपण केले. यातून त्या सर्वांना अनोख्या पध्दतीने गेट टू गेदर (स्नेह मेळावा ) साजरा करता आला.
याच खडकाळात या दाेन्ही बॅचच्या विद्यार्थ्यांनी मैत्रीचे रानमाळ फुलवले आहे. त्या ओसाड आणि खडकाळ जाग्यावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणे निश्चितच अभिनंदनीय आणि अभिमानाची गोष्ट आहे.
वरील फोटोमध्ये दिसणारे सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणी जवळजवळ २२ वर्षांनी एकमेकांना भेटत होते. कोण कुठे काय करतो, याबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये उत्सुकता होती. सगळ्यांची इच्छा पुन्हा एकदा मागे वळून आपल्या कुटुंबासाठी, शाळेसाठी, गावासाठी आणि आपल्या समाजासाठी काहीतरी करावे अशीच होती.
अश्या अनोख्या गेट टू गेदर चे कौतुक परीसरातील पर्यावरण प्रेमी करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गुडलक चौक परिसरातील ‘कलाकार कट्टा’ स्थलांतर निर्णयाचा पुनर्विचार व्हावा – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी...

पुण्यात टिपू सुलतान यांच्या विटंबनेची तक्रार- फडणवीस व भाजपा आणि PPS वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे-पुण्यात टिपू सुलतान यांच्या विटंबनेविरोधात स्वाती विलास गायकवाड (रा....

महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंडी 

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त चक्केश्वराची पूजापुणे...

महापालिकेत प्रोटोकॉल ऑफिसर, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी सह विविध पदांची भरती!

पुणे- महापालिकेतील विविध संवर्गातील एकाकी पदांची सरळसेवा भरती केली...