मद्यपान करणारे ग्राहक सुरक्षितपणे घरी पोहोचतील याची खात्री करणे ही पबमालकांची जबाबदारी; न्यायालयाने सुनावले!

Date:

पुणेकल्याणीनगर अपघात प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी पबचालकांना चांगलेच फटकारले आहे . गरज पडल्यास मद्यधुंदांच्या राहण्याची व्यवस्था मालकांनी पबमध्ये करावी, असे त्यांनी सुनावले आहे. विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे म्हणाल्या, ‘‘पब चालवणे म्हणजे मजा नाही. मद्यपान करणारे ग्राहक सुरक्षितपणे घरी पोहोचतील याची खात्री करणे ही पबमालकांची जबाबदारी आहे. मद्यधुंद व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी गेटच्या बाहेर एक व्यक्ती तैनात करायला हवी. मद्यधुंदांना गाडी चालवून देऊ नका. गरज पडल्यास त्यांची राहण्याची व्यवस्था तेथेच करा.’’

‘ब्लॅक’मधील कामगारांनी अल्पवयीन मुलांना टेबलवर मद्य पुरविल्याचेही पोलीस तपासातून पुढे आले आहे. बेदरकारपणे कार चालविणाऱ्या मुलासह इतर अल्पवयीन मुलांना पबमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही पब मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना काल अटक करण्यात आली.

कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्म विलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर) आणि ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली.

‘ब्लॅक’ पबमधील कामगारांनी अल्पवयीन मुलांना टेबलवर मद्य पुरविल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे. पोलिसांकडे प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींनी त्यांच्या पबमध्ये अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्रांच्या वयाची खात्री करता मद्य पुरविल्याचे दिसते. तसेच हॉटेलमध्ये दर्शनी भागावर कोठेही बाल न्याय अधिनियम कलम ७७ प्रमाणे नोटीस किंवा सूचना लावलेली नसल्याने आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध होत असल्याचे सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.अल्पवयीन मुलांना पबमध्ये दारू देणे हा अदखलपात्र गुन्हा आहे. तर मोटार वाहन कायद्यानुसार दाखल कलमांबाबतची कारवाई योग्य नाही. कारण आरोपी मोटारीचे मालक नाहीत. तसेच त्या अनुषंगाने त्यांचा गुन्ह्यात काहीच सहभाग नाही. त्यामुळे अटकेची कारवाई बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद अॅड. जैन यांनी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा-खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेत मागणी

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकडे वेधले लक्ष वर्षाकाठी १० हजार कोटींचे आर्थिक...

पुण्यात हिंदू महासभा रिंगणात:महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर

पत्रकार परिषदेत प्रदेश कार्यकारिणीकडून माहिती पुणे:अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी...

अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. 18 डिसेंबर : परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध...