Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गोदरेज कॅपिटलचा महाराष्ट्रातील डेअरी फार्म कर्जामध्ये प्रवेश

Date:

क्रीमलाइन डेअरी प्रोडक्ट्स लिमिटेड आणि द्वारा डेअरी सह भागीदारी

§  या भागीदारीद्वारेडेअरी फार्मिंग समाजाला सक्षम करणे हे गोदरेज कॅपिटलचे उद्दिष्ट आहेतसेच संपूर्ण इकोसिस्टीममध्ये आर्थिक समावेशकता आणि आर्थिक समृद्धी आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

§  आंध्र प्रदेशतेलंगणाकर्नाटक आणि तमिळनाडू शेतकऱ्यांना मदत देण्याची योजना

मुंबई२१ मे२०२४गोदरेज उद्योग समूहाची वित्तीय सेवा शाखा, गोदरेज कॅपिटलने डेअरी फार्म लोन लाँच करून कृषी क्षेत्रात प्रवेशाची घोषणा केली. क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि द्वारा ई-डेअरी यांच्यासोबत धोरणात्मक भागीदारी करत गोदरेज कॅपिटल महाराष्ट्र आणि इतर भागातील  लहान डेअरी फार्म मालकांना आर्थिक सहकार्य करेल. क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड ही गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड (जीएव्हीएल) ची उपकंपनी आहे. गोदरेज उद्योग समुहाअंतर्गत ही कंपनी वैविध्यपूर्ण खाद्य आणि कृषी-व्यवसाय पाहते. गोदरेज जर्सी या ब्रँड नावाने ही उत्पादनांची विक्री करते.

भारतातील दुग्धजन्य पदार्थांचा वापर सातत्याने वाढत असल्याने, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही उत्तम संधी तर आहेच पण आव्हाने देखील निर्माण करते. उत्पादकता सुधारणे तसेच देशात आर्थिक समृद्धी आणण्यासाठी वेळेवर आणि योग्य वित्तपुरवठा करून या शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचे महत्त्व गोदरेज कॅपिटलने ओळखले आहे. म्हणूनच या उपक्रमांतर्गत, गोदरेज कॅपिटलने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भागीदार म्हणून Dvara E-Dairy ला सोबत घेतले आहे.

दुग्धव्यवसायासाठी कर्ज देण्यासोबतच गोदरेज कॅपिटल GAVL च्या यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना गुराढोरांची खरेदी तसेच त्यांच्या देखभालीसाठी तारण-मुक्त कर्ज उपलब्ध करून देईल. या ऑफरमुळे डेअरी फार्म मालकांना आर्थिक सहकार्य तर मिळेलच पण यासह इतर फायदे देखील मिळतील. यात पूर्ण डिजीटल प्रक्रिया, कर्ज किंवा अन्य अर्जाची जलद मंजुरी आणि वितरण आणि दोन वर्षांपर्यंतचे कर्जफेडीचा पर्याय यांचा समावेश आहे.

गोदरेज कॅपिटलचे एमडी आणि सीईओ मनीष शाह म्हणाले, “आमच्या देशातील शेतकऱ्यांना पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहेदुग्धव्यवसाय समाजाला आर्थिक सहाय्यप्रोत्साहन देण्याची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहेतसेच याद्वारे एक सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहेकृष्णागिरी जिल्ह्यात पहिल्या कर्जाचे वितरण ही केवळ एक सुरुवात आहेवास्तविक आम्ही तामिळनाडूच्या इतर प्रदेशांमध्ये डेअरी उद्योग सक्रिय करण्यात आणि आंध्र प्रदेशतेलंगणाकर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहोतयासह डेअरी फार्मिंग क्षेत्राच्या वाढीसाठी आणि विकासात योगदान देण्याचे आमचे ध्येय आहे.”

अनेक मर्यादा असूनही आजही डेअरी उद्योगाचे भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान आहे. यावर जवळपास 80 दशलक्ष शेतकऱ्यांची उपजीविका चालते. दुधाच्या एकूण खर्चाच्या 70% मध्ये आहार हा सर्वात मोठा घटक आहे. उत्तम आणि पोषक आहार हा निरोगी दुग्धव्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. याचा गुरांच्या दुग्धउत्पादकतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे शेतकऱ्याची प्रगती होते. उत्तम आणि भरपूर दूध उत्पादनासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आवश्यक ती साधने उपलब्ध करून देण्यावरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

भूपेंद्र सुरीमुख्य कार्यकारी अधिकारीगोदरेज जर्सीम्हणाले“गुरांचे चांगले आरोग्य म्हणजे उत्तम दुग्धउत्पादन. यामुळे शेतकरी देखील सक्षम होतात. आणि त्यांचा नफा वाढतो. त्यामुळे, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दर्जेदार खाद्य उपलब्ध होणे ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. गोदरेज कॅपिटल आणि द्वारा ई-डेअरी यांच्यातील ही भागीदारी शेतकऱ्यांना गुरांचे दर्जेदार खाद्य मिळवून देईलच पण शेतीविषयक इतर गरजांसाठी वित्तपुरवठा सुलभ करण्यास सक्षम करेल. या प्लॅटफॉर्मचा फायदा घेऊन आमचे शेतकरी गुरांची संख्या वाढवू शकतात तसेच उच्च उत्पादकता आणि चांगल्या समृद्धीसाठी प्रयत्न करू शकतात.”

Dvara E-Dairy चे संस्थापक, MD आणि CEO रवी के.म्हणाले, “गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या कंपन्यांसोबत भागीदारी ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. या भागीदारीमुळे भागधारकांचे मूल्य वाढले आहे. तसेच यामुळे हजारो दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गोदरेजकडून परवडणाऱ्या दरात वित्तपुरवठा उपलब्ध होणार आहे. याशिवाय भांडवल तसेच कॅटल लोनसाठी हा एक नावीन्यपूर्ण प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. या सगळ्या व्यवस्थेमुळे आर्थिक सेवा या अगदी घरात उपलब्ध होणार आहेत. यासोबतच दुग्ध उत्पादकांना दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी, त्यांच्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम करेल.”

गोदरेज कॅपिटल सर्वसमावेशक वातावरण निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहे, तसेच जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना आर्थिक पाठबळही देत आहे.

यासोबतच, गोदरेज कॅपिटल एमएसएमई कर्जासाठी महाराष्ट्राच्या बाजारपेठेतील 10% हिस्सा मिळवण्याचा विचार करत आहे. मागील वर्षापासून ही कंपनी पाय भक्कमपणे रोवून उभी असून त्याच आधारे कंपनीने कोल्हापूर आणि ठाणे उघडत राज्यात आपला ठसा उमटवला आहे. स्थानिकांच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच त्या – त्या भागातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी गोदरेज कॅपिटल काय काय करते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा विस्तार. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...