Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रसिद्ध कर्करोग विशेषज्ञ डॉ. (प्रा.) ज्योती बाजपेयी अपोलो कॅन्सर सेंटर येथे मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी च्या प्रमुख म्हणून रुजू 

Date:

डॉ. ज्योती बाजपेयी यांना ऑन्कोलॉजीचा 19 वर्षांहून अधिक अनुभव असून यापूर्वी त्या मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटर येथे 15 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत होत्या.

~डॉ. ज्योती बाजपेयी या युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ईएसएमओ) च्या लीडरशिप ग्रॅज्युएट आहेत आणि वुमन फॉर ऑन्कोलॉजी (ईएसएमओ-डब्ल्यू 40) च्या कोअर कमिटी सदस्य आहेत,
तसेच इम्यूनोथेरपी आणि सारकोमासाठी भूतपूर्व फॅकल्टी आहेत.

~त्यांनी प्रशिक्षणात मेमोरियल स्लोन केटरिंग सेंटर, न्यूयॉर्क, यूएसए आणि सिडनी किमेल कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर, जॉन्स हॉपकिन्स, बाल्टीमोर, यूएसए येथे निरीक्षक हे पद देखील भुषविले आहे.

पुणे2मे 2024:  नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने आज जाहीर केले आहे की, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ ऑन्कोलॉजिस्ट डॉ. ज्योती बाजपेयी अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी (मुंबई आणि महाराष्ट्र क्षेत्र) च्या प्रमुख म्हणून कॅन्सरविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाल्या आहेत. डॉ. बाजपेयी यांनी इम्युनो-ऑन्कोलॉजी, प्रिसिजन मेडिसिन, दुर्मिळ आणि आव्हानात्मक कर्करोग (सारकोमा, गर्भधारणा-संबंधित कर्करोग, किशोरवयीन आणि तरुण प्रौढांमधील कर्करोग, एलजीबीटीक्यू+ कर्करोग, वृद्धापकाळातील कर्करोग) आणि स्त्रियांचे कर्करोग  (स्तन आणि स्त्रीरोग) या क्षेत्रातील केलेल्या कार्यासाठी त्या एक प्रसिद्ध चिकित्सक म्हणून ओळखल्या जातात.

डॉ. बाजपेयी यांचा टाटा मेमोरिअल सेंटर, मुंबई येथे प्राध्यापक आणि ब्रेस्ट डीएमजी कन्व्हेनर म्हणून 15 वर्षांचा अनुभव तसेच कर्करोगाच्या क्षेत्रातील 19 वर्षांचा अनुभव लाभदायक ठरणार आहे. त्यांना न्यू यॉर्क, यूएसए मधील प्रख्यात मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर (एमएसकेसीसी) कडून इम्युनो-ऑन्कोलॉजी आणि मेलेनोमामधील विशेष प्रशिक्षण आणि बाल्टिमोर, यूएसए मधील जॉन्स हॉपकिन्स येथील प्रतिष्ठित सिडनी किमेल कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरमधून हाडे आणि सॉफ्ट टिश्यू सारकोमामधील दीर्घ अनुभव असल्यामुळे डॉ. बाजपेयी आपली वैद्यकीय कार्ये कुशलतेने हाताळतात. शिवाय, त्यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) येथे प्रशिक्षण घेतले आहे आणि त्या ईएसएमओ लीडरशिप ग्रॅज्युएट आहेत.

अपोलो कॅन्सर सेंटर्स (मुंबई आणि महाराष्ट्र क्षेत्रच्या मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या प्रमुख डॉज्योती बाजपेयी म्हणाल्या, “अपोलो कॅन्सर सेंटर्समध्ये सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. हे रुग्णालय जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट संस्थांच्या बरोबरीने वैद्यकीय सेवा प्रदान करते. प्रोटॉन बीम थेरपी, ब्रेन ट्यूमरसाठी झेडएपी-एक्स थेरपी आणि ट्यूमर बोर्ड बेस्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स यांसारख्या प्रगत सुविधांमुळे मी माझ्या रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देऊ शकते. माझ्या प्रशिक्षण आणि अनुभवाने, मी अपोलो कॅन्सर सेंटरमधील कार्यक्रम मजबूत करण्यास उत्सुक आहे.”

युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ईएसएमओ) लीडर्स जनरेशन प्रोग्रामच्या पदवीधर असलेल्या डॉ. ज्योती बाजपेयी आज ईएसएमओ-डब्ल्यू40 (वुमन इन ऑन्कोलॉजी) च्या कोअर कमिटी सदस्य आहेत. डॉ. बाजपेयी यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ईएसएमओ) आणि सोसायटी फॉर इम्युनोथेरपी ऑफ कॅन्सर (एसआयटीसी) आणि सारकोमा, स्त्रीरोगविषयक कर्करोग आणि स्तनाच्या कर्करोगाच्या इम्युनोथेरपीसाठी ऍडव्हान्स्ड ब्रेस्ट कॅन्सर (एबीसी) ची मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी देखील त्यांनी योगदान दिले आहे. सारकोमा, गर्भधारणेशी संबंधित कर्करोग, स्तन आणि स्त्रीरोगविषयक कर्करोग, इम्युनो-ऑन्कोलॉजी आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी यांसारख्या दुर्मिळ कर्करोगांसारख्या त्यांच्या मुख्य आवडीच्या क्षेत्रातील त्यांचे संशोधनात्मक कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहे.

अपोलो हॉस्पिटल्सचे पश्चिमी विभागाचे प्रादेशिक सीईओ श्रीसंतोष मराठे म्हणाले, “जागतिक मानकांसोबत खांद्याला खांदा लावून आरोग्य सेवा पुरवणे ही अपोलो हॉस्पिटल्सची बांधिकली आहे. नवी मुंबईतील एसीसी येथे एकाच छताखाली रोग व्यवस्थापन उपचार मार्गांसह (डिसीज मॅनेज्ड केअर पाथवेजसह) विशिष्ट अवयवांसाठी पूर्णवेळ चिकित्सक असल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत आहे. नवी मुंबईतील एसीसी येथे विशेष प्रशिक्षित परिचारिका, ऍडव्हान्स्ड रिहॅब आणि शस्त्रक्रियेनंतरच्या टीमद्वारे प्रिसिजन टेक्नॉलॉजी सॉल्युशन्ससह कर्करोगासाठी व्यापक वैद्यकीय सेवा प्रदान केली जाते.

आमच्या कुशल ऑन्कोलॉजी टीममध्ये डॉ. ज्योती बाजपेयी यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे, कारण त्यांच्या येण्यामुळे केवळ मुंबईतील अपोलो कॅन्सर सेंटर्स मध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील कर्करोगाच्या रुग्णांना खूप फायदा होणार आहे. डॉ. बाजपेयी यांनी दुर्मिळ कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रशिक्षण घेतल्यामुळे कर्करोगाच्या उपचारासाठी सर्वसमावेशक आणि प्रगत उपचार देण्यात मदत होईल. त्यांच्या अष्टपैलू गुणांमुळे नवी मुंबईतील अपोलो कॅन्सर सेंटर्स येथील इतर वरिष्ठ सल्लागारांना उपचार देताना खूप मदत होणार आहे. यामुळे प्रदेशातील कर्करोग रुग्णांसाठी उपचारात्मक पर्याय वाढणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...