Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महाराष्ट्रात 12वीचा निकाल 93.37%तर पुण्याचा निकाल 94.44% यंदाही मुलींनी मारली बाजी

Date:

13 लाख विद्यार्थी उत्तीर्ण; विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार निकाल
पुणे- माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गत फेब्रुवारी – मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी दुपारी 1 वा. ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. यंदा बारावीचा निकाल तब्बल 93.37% लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावेळी 2.12 टक्के विद्यार्थी जास्त उत्तीर्ण झालेत. आता विद्यार्थ्यांना 5 जूनपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुभा आहे.

यंदाही मुलींनी मारली बाजी

पुणे-BMCC
Ekta Harshawardhan Patil
Total Marks 585
97.50%

दरम्यान, यंदा महाराष्ट्राचा 12 वीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. तर एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 91.60 अशी आहे. तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 95.44 अशी आहे. कोकणात सगळ्यात जास्त 97.91 % निकाल तर मुंबईत सगळ्यात कमी 91.95 % निकाल लागल्याचे समोर येत आहे.

Eeshita Sachin Godse
Total marks 584
Percentage 97.33%

6581 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7032 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6983 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 6581 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 94.20 आहे. तर नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.

34,988 खाजगी विद्यार्थी उत्तीर्ण
खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 41,362 एवढी असून त्यापैकी 40,794 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 34,988 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी 85.76 आहे.

राज्यातील नऊ विभागीय मंडळातील निकाल

कोकण 97.51%
नाशिक 94.71%
पुणे 94.44%
नागपूर 92.12%
छत्रपती संभाजीनगर 94.08%
मुंबई 91.95%
कोल्हापूर 94.24%
अमरावती 93.00%
लातूर 92.36%

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण 14,33,371 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,23,970 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी 93.37 आहे

निकाल कुठे व कसा पाहता येईल?

बारावीच्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना खालील संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल.

mahahsscboard.in
mahresult.nic.in
results.gov.in
hscresult.mkcl.org
result.digilocker.gov.in
5 जून पर्यंत गुणपडताळणीसाठी मुदत
विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी 1 वाजेनंतर वरील संकेतस्थळावर जावे. त्यानंतर आपला रोल नंबर व इतर माहिती त्यात टाकून एंटर बटन दाबावे. त्यानंतर 12 वीची मार्कशिट तुमच्या स्क्रीनवर दिसेल. ही मार्कशिट पुढील संदर्भासाठी डाऊनलोडही करून ठेवता येईल. छत्रपती संभाजीनगर विभागातून या परीक्षेसाठी 449 केंद्रावर 1,79, 014 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. निकालानंतर 22 मे ते 5 जून पर्यंत गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकालही पुढल्या आठवड्यात लागण्याचा अंदाज आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातील एकूण 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 लाख 59 हजार 478 विद्यार्थी, तर 7 लाख 49 हजार 911 विद्यार्थीनी आणि 56 तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गतवर्षी 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विमान वाहतूक कोसळली: काय म्हणाले मंत्री मोहोळ

इंडिगोने पायलटच्या कामाची वेळ पाळली नाही: ४ सदस्यीय चौकशी...

अजित पवारांबरोबर नाहीच , महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, खुद्द शरद पवारांची मान्यता – प्रशांत जगताप

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...