‘स्पाइस अँड फॅक्टरी’ हॉटेलात पती समोर IT अभियंता असलेल्या विवाहितेचा विनयभंग ..३ भामटे ८ दिवस झालेत पोलिसांना सापडेनात

Date:

पुणे-हिंजवडीमधील ‘स्पाइस अँड फॅक्टरी’ हॉटेलच्या लिफ्टमध्ये आयटी अभियंता दाम्पत्याला (IT Engineer Couple) मारहाण करुन विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पळून गेलेल्या तिघांचा गेल्या आठ दिवसांपासून शोध लागलेला नाही.

याबाबत पीडित 26 वर्षीय आयटी अभियंता विवाहित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध आयपीसी 354, 341, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिला पतीसह ‘स्पाइस अँड फॅक्टरी’ हॉटेलमध्ये जेवण करण्याकरीता शुक्रवारी (10 मे) रात्री सव्वा अकरा वाजता गेली होती. त्यावेळी लिफ्टमध्ये तीन मद्य प्राशान केलेले युवक आले. दाम्पत्याला दुसऱ्या मजल्यावर हॉटेलमध्ये जाण्यासाठी लिफ्टच्या बाहेर जायचे होते. त्यावेळी तिघापैकी एकाने पीडितेला छेडछाड करण्यास सुरुवात केली. त्याला विरोध केला असता इतरांनी पतीला मारहाण करुन लिफ्ट नवव्या मजल्यावर नेली.त्याठिकाणी महिलेचा गळा आवळला तर पतीला लिफ्ट बाहेर ढकलून दिले.

तुम्ही तळमजल्यावर चला मग तुम्हाला दाखवतो असे म्हणून पुन्हा आयटी अभियंता दाम्पत्याला शिवागाळ करीत आरोपी निघून गेले.या इमारतीच्या तळमजल्यावर तसेच प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.परंतु, लिफ्टमध्ये कॅमेरे नाही. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने पोलिसांना याची माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...