थोरले नानासाहेब पेशव्यांचे कर्तृत्व लोकांच्या नजरेआड-इतिहास अभ्यासक डॉ. उदय कुलकर्णी

Date:

पर्वतीवरील श्री देवदेवेश्वराच्या  २७३ वा स्थापना दिन :  श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण
पुणे : थोरले नानासाहेब पेशवे यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी अनेक मोहिमा केल्या आहेत.  त्यांच्या काळात मराठेशाही उच्च पदावर पोहोचली. किती युद्धे जिंकली यावरून त्यांच्या कर्तृत्वाचे आकलन होत नाही. त्यांचा विशाल दृष्टिकोन, राजनीति, प्रशासकीय कौशल्ये असे  त्यांचे अनेक  पैलू आहेत. परंतु काही ना काही कारणामुळे त्यांचे कार्य लोकांच्या नजरेआड गेले आहे, असे मत इतिहास अभ्यासक डॉ. उदय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

पर्वतीवरील श्री देवदेवेश्वराच्या  २७३ व्या स्थापना दिनानिमित्त  श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी देव देवेश्वर संस्थानाचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त जगन्नाथ लडकत, सुधीर पंडित, आशिष कुलकर्णी उपस्थित होते. पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा  यांच्या हस्ते अर्ध पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.  ‘श्रीमंत नानासाहेब पेशवे आणि पुणे’ या विषयावर डॉ. उदय कुलकर्णी यांचे व्याख्यान यावेळी झाले.

डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले, नानासाहेब पेशव्यांचा दरारा इतका मोठा होता की त्यांचे काम युद्ध न करता एका पत्रावर व्हायचे. नानासाहेबांवर अनेक आरोप, प्रत्यारोप झाले परंतु अभ्यास केल्यावर त्यांच्या प्रत्येक कृती मागे अर्थ असल्याचे लक्षात येते. कात्रज तलावातून पाणीपुरवठा, पर्वती मंदिर, सारसबाग, आंबील ओढा वळवणे, लकडीपूल मंदिर अशी अनेक मोठी कामे त्यांच्या काळात झाली. आज पुण्यात त्यांचे एकही स्मारक नाही, एकाही चौकाला किंवा रस्त्याला त्यांचे नाव नाही, ही खंत वाटते असेही त्यांनी सांगितले.

रमेश भागवत म्हणाले, पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या पर्वतीवरील श्री देवदेवेश्वराच्या २७३ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या ठिकाणी पुढच्या टप्प्यात युद्ध स्मारक देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जगन्नाथ लडकत म्हणाले, श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचे कर्तृत्व मोठे आहे. पर्वतीच्या वर्धापन दिनानिमित्त आज त्यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण पर्वतीवर झाले, ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची घटना आहे. आजच्याच दिवशी काका चिमाजी आप्पा पेशवे यांनी वसईचा किल्ला जिंकला. आणि आजच्याच दिवशी पुतण्या थोरले नानासाहेब पेशवे यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण झाले.

रमेश भागवत यांनी प्रास्ताविक केले. सुधीर पंडित यांनी आभार मानले. आदिती अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...