पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

Date:

मुंबई:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही शारिरिक चाचणी २४ मे ते ६ जून २०२४ या कालावधीत पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-१७, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीतील  नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता मैदान, अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करुन देण्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने सहमती दर्शविल्याने शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम २४ मे, ते  ६ जून, २०२४ या कालावधीत  घेण्यात येणार आहे.

शारीरिक चाचणीचा कार्यक्रम तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येईल. तरी शारीरिक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या सरावाच्या दृष्टीने यांची नोंद घ्यावी व आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणीचा सराव करावा. शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.

0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...