पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालय व कॅड सेंटर पुणे यांचे संयुक्त विद्यमाने ‘जॉब पक्का फेअर २०२४’ या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन डॉ.पराग काळकर प्र.कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मोहम्मद उस्माणी डेप्युटी सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, बी.के. खुशवाह डीन ऑफ रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हील इंजिनिअरिंग पुणे , एम.डी. सेलव्हन व्यवस्थापकीय संचालक कॅड सेंटर पु.शिबू पितांबरम चीप ऑपरेटिंग ऑफिसर कॅड सेंटर पुणे, प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे, डॉ.विजय वढई इनोव्हेशन क्लब मेंबर यांचे उपस्थितीत झाले. या प्रसंगी बोलताना डॉ. पराग काळकर यांनी विद्यार्थ्यांनी उद्योगक्षेत्राची बदलती कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन स्वतः मध्ये नवनवीन कौशल्य विकसित करावी. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स, ऑटोमेशन, आर्टिफिशयल इंटेलिजन्सचे युग आहे. भविष्यात याच तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी उपलब्ध होणार आहेत.विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच हे नव तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. आजच्या तरुणाईमध्ये सामाजिक प्रश्न सोडविण्याची क्षमता आहे. स्वतःची व समाजाची शास्वत प्रगती करण्यासाठी या स्पर्धेच्या युगात डिग्री बरोबर स्वतःमध्ये नवकौशल्य विकसित करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करावे असे आवाहन या प्रसंगी विद्यार्थ्यांना केले. मोहम्मद उस्माणी यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे अनुभव सांगून मुलाखत कशी द्यावी, स्वतः मधील चांगल्या गोष्टी ज्यास्त अधोरेखीत कराव्यात या विषयी मार्गदर्शन केले. श्री. एम.डी. सेलव्हन यांनी कोरोना नंतरच्या काळात फ्रेशर विद्यार्थ्यांना नोकरीच्या उपलब्ध करून देण्याचे कार्य कॅड सेंटरच्या माध्यमातून अविरतपणे चालू आहे या संधीचा विद्यार्थ्यांनी जास्तीत ज्यास्तीत फायदा घ्यावा असे आवाहन या प्रसंगी केले. सदर जॉब फेअरमध्ये सिव्हील, मेकानिकल, आयटी, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर, डिझाईन इंजिनिअरिंग ,स्टक्चरल इंजिनीअरिंग,बँकिंग,फायनान्स, केपिओ,बिपिओ या सारख्या विविध क्षेत्रातील नामांकित ४५ बहुराष्ट्रीय कंपन्यानी विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी उपस्थिती दर्शविली. सबंध महाराष्ट्रातून या जॉब फेअर साठी ३६२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
सदर कार्याक्रमासाठी डॉ.पराग काळकर, श्री. बी.के. खुशवाह, मोहम्मद उस्माणी, श्री. एम.डी. सेलव्हन, .शिबू पितांबरम, डॉ.सुनील ठाकरे, डॉ.विजय वढई, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थ्यी बहुसंख्येने उपस्थित होते. महाविद्यालयात ‘जॉब पक्का फेअर २०२४’ चे आयोजन केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.