Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुंबईच्या २ मतदारसंघात २४ लाख ४६ हजार ०८८ मतदार

Date:

मुंबई :-  भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी (दिनांक १६ मार्च २०२४) पत्रकार परिषद घेऊन सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४ ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात ३०-मुंबई दक्षिण मध्य,व  ३१- मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ असून २४ लाख ४६ हजार ०८८  पात्र मतदार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात दिनांक २० मे २०२४ (सोमवार) रोजी पाचव्या टप्य्यात मतदान होणार असून  दिनांक ४ जून २०२४ (मंगळवार) रोजी  मतमोजणी होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

मुंबई शहर जिल्हा कार्यालय, नियोजन भवन, मुंबई  येथे  आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी माहिती दिली.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे :

  •  निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक २६ एप्रिल २०२४ (शुक्रवार)
  •  नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक ३ मे २०२४ (शुक्रवार)
  •  नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक ०४ मे २०२४ (शनिवार)
  •  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ०६ मे २०२४ (सोमवार)
  •  मतदानाचा दिनांक २० मे २०२४ (सोमवार)
  •  मतमोजणी दिनांक ०४ जून २०२४ (मंगळवार)
  •  निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक ६ जून २०२४ (गुरुवार)

आदर्श आचारसंहितेचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे

सार्वत्रिक लोकसभा  निवडणूकीची आदर्श संहिता सुरु आहे. या आदर्श आचारसंहितेचे सर्वसंबंधीत घटकांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आणि  मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारांसाठी असलेल्या सोयी सुविधा, मतदान केंद्राची रचना तेथील सुविधा, संवेदनशिल मतदान केंद्रासंदर्भात विशेष उपायोजना याबाबत सविस्तर माहिती दिली.

मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी साडेबारा हजार कर्मचारी अधिकारी सज्ज

लोकसभा निवडणूक-२०२४  साठी मुंबई शहर जिल्हा अंतर्गत असलेल्या ३० मुंबई दक्षिण मध्ये ३१ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी साडेबारा हजार अधिकारी कर्मचारी नियुक्त केले असून निवडणुका पारदर्शक नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी श्री. संजय यादव यांनी दिली.

मुंबई शहर जिल्ह्याच्या निवडणूक अनुषंगाने माहिती

  •  एकूण मतदार :- २४ लाख ४६ हजार ८८
  •  एकूण पुरुषः- १३ लाख २१ हजार ७८२
  •  एकूण स्त्री:- ११लाख २४ हजार ८४
  •  एकूण तृतीय पंथीः- २२२ (दोनशे बावीस)

१८+ या वयोगटातील मतदार

  • एकूण मतदारः- १७हजार ७२६
  • एकूण पुरुषः ९ हजार ८७६
  • एकूण स्त्री:- ७ हजार ८५०

२०-२९ या वयोगटातील मतदार

  • एकूण मतदारः- २,लाख ९१ हजार ५०२
  • एकूण पुरुषः- १ लाख ६१ हजार ६९४
  • एकूण स्त्रीः- १लाख २९ हजार ७३७

दिव्यांग मतदार

  • एकूण मतदार :- ५०९३(पाच हजार त्र्यान्वय)
  • एकूण पुरुष:- ३०३२ (तीन हजार बत्तीस)
  • एकूण स्त्रीः-२०६१ (दोन हजार एकसष्ठ)

मतदान केंद्राची माहिती

  • एकूण मतदान केंद्रः- २५ हजार ९
  • एकूण सहाय्यकारी मतदान केंद्र:- ८
  • एकूण सखी महिला मतदान केंद्रः- ११
  • नवयुवकांनी चालविण्याचे मतदान केंद्रः-११

दिव्यांग यांनी चालविण्याचे मतदान केंद्र : ८ आहेत. अशी माहिती देऊन समाज माध्यमातून येणाऱ्या तक्रारी शंका त्यांचे करावयाचे निरसन याबाबतही यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी माहिती दिली.

0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर:आता मतमोजणी 21 डिसेंबरलाच

नवी दिल्ली- राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान...

पुतिन यांना राष्ट्रपती भवनात 21 तोफांची सलामी:राजघाटावर गांधींना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात...