आजकाल आपल्यापैकी बरेच लोक रेफ्रिजरेटरमध्ये अनेक साहित्य आणि आवडीचे खाद्यपदार्थ ठेवतात. असे केले जाते आपल्या पसंतीचे पदार्थ जास्त काळ ताजे आणि वापरासाठी सुरक्षित राहावेत यासाठी. एक सुव्यवस्थित आणि योग्यरित्या व्यवस्थापित केलेला रेफ्रिजरेटर अन्नाची नासाडी कमी करण्यात खूप मदत करतो.
तुमच्या रेफ्रिजरेटरची कामगिरी जास्तीत जास्त सुधरवण्यासाठी आणि फ्रीजमध्ये साठवलेले खाद्यपदार्थ अधिक काळ टिकण्यासाठी गोदरेज अप्लायन्सेसमधील रेफ्रिजरेटर्सचे उत्पादन गट प्रमुख अनुप भार्गव यांच्या काही झटपट टिपा दिल्या आहेत.
· वर्गीकरण करणे आणि नीट लावून ठेवणे: सुव्यवस्थित फ्रिज असेल तर त्यामधून अन्न शोधणे आणि त्याचा ताजेपणा राखणे यासाठी मदत होते. साधारणपणे एकत्र वापरले जाणारे खाद्यपदार्थ एकत्रितपणे आणि लगेच कळून येण्यासाठी बाहेरून वस्तू दिसू शकणाऱ्या कंटेनरमध्ये साठवता येऊ शकतात. फ्रीजमध्ये नको असलेले पदार्थ भरून ठेवणे टाळा.
· योग्य तापमान सेटिंग्ज ठेवणे: तुमच्या अन्नाचे शेल्फ-लाइफ वाढवण्यासाठी, अन्नपदार्थ योग्य तापमानावर आणि रेफ्रिजरेटरच्या उजव्या विभागात साठवा. काही खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये जास्तीत जास्त ताजेतवाने ठेवण्यासाठी साठवले जाणे आवश्यक आहे, तर काही फ्रीझर विभागात जास्त काळ राहतात. सध्याच्या काळातील आधुनिक फ्रॉस्ट-फ्री आणि 4-डोअर रेफ्रिजरेटर्समध्ये साठवणुकीच्या आवश्यकतांनुसार फ्रीजमधून फ्रीझरमध्ये किंवा उलट अशी विभागांची अदलाबदल करण्यासाठीचे झटपट पर्याय असतात.
· फर्स्ट इन, फर्स्ट आउट पद्धत: अन्न साठवताना फ्रीजमध्ये आधी ठेवलेल्या जुन्या वस्तू आणि कमी शेल्फ-लाइफ असलेल्या वस्तू नवीन वस्तूंपूर्वी वापरण्यास प्राधान्य द्या. असे केल्यास लवकर कालबाह्यता तारखा असलेल्या वस्तू प्रथम वापरल्या जातील आणि अन्नाची नासाडी कमी होण्यास मदत होईल.
· रेफ्रिजरेटरमध्ये काय ठेवावे: फळे, भाज्या, लोणचे, ड्रेसिंग्ज, मसाले, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, चॉकलेट, शिजवलेले अन्न, अंडी फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे, तर आइस्क्रीम, पल्प आणि प्युरी, मांस आणि पोल्ट्री यांसह गोठवलेले पदार्थ फ्रीझर विभागात उत्तम प्रकारे साठवले जातात. पॅकेज फूड सारख्या खाद्यपदार्थांवरील लेबल तपासा आणि वस्तू फ्रिजमध्ये किंवा रेफ्रिजरेटरच्या फ्रीझर विभागात ठेवण्यासाठी योग्य आहेत का हे तपासून घ्या.
· रेफ्रिजरेटरमध्ये काय ठेवू नये: कांद्यासारख्या वस्तू रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. कारण त्यांची चव आणि गुणवत्ता बदलू शकते. तेल, सौंदर्यप्रसाधने, मध, संत्री किंवा सोललेली केळी यासारखी काही फळे फ्रीजमध्ये ठेवणे टाळा. तसेच शिजवलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवण्याआधी सामान्य तपमानावर येऊ द्यावे.
· क्रॉस–कॉनटॅमिनेशन होण्यापासून प्रतिबंध करा: ओलावा कमी होणे टाळण्यासाठी, चव टिकवून ठेवण्यासाठी आणि फ्रीजमध्ये कोणताही वास पसरू नये म्हणून उरलेले खाद्यपदार्थ किंवा उग्र वास असणारे पदार्थ साठवण्यासाठी हवाबंद डबे वापरा. कच्चे मांस आणि सीफूड फ्रीजरमध्ये किंवा वेगळ्या शेल्फमध्ये ठेवा जेणेकरून फ्रिजमध्ये इतर पदार्थांना त्यांचा वास लागणार नाही. ज्यूस सारख्या गोष्टींसाठी न गळणारे म्हणजेच लीक-प्रूफ कंटेनर्स वापरा. त्यामुळे इतर पदार्थांशी त्यांचा संबंध येणार नाही.
· नाशवंत पदार्थांसाठी अतिरिक्त काळजी: फळे आणि भाज्यांसारखे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी स्वच्छ करून आणि कोरडे करून ठेवावेत. पदार्थांमध्ये ओलावा राहिल्यास तो पदार्थ जलद खराब होऊ शकतो. तुम्ही तुमच्या हिरव्या भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यापूर्वी वाळवूही शकता.
· अन्न सुरक्षा: सर्वसाधारण रेफ्रिजरेटर मुख्यत्वे तापमान व्यवस्थापनाद्वारे अन्न साठवतात, टिकवून ठेवतात. तर गोदरेजचे प्रगत फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटर्स याच्या एक पाऊल पुढे आहेत. नॅनो शील्ड तंत्रज्ञान (पेटंट लागू) ने ते सुसज्ज आहेत. ते जंतूंविरूद्ध 95%हून अधिक अन्न पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करतात त्यामुळे अन्न अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षित राहते. आताच्या आधुनिक काळात शेतापासून घरापर्यंत अन्नपदार्थ अनेक हातातून येत असतात आणि त्यामुळे जंतूंचा धोकाही वाढत असतो. यासारख्या तंत्रज्ञानामुळे तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण करण्यात आणि अन्नाची नासाडी कमी करण्यात मदत होते.
· वारंवार दार उघडणे टाळा आणि दारे व्यवस्थित बंद करा: थंड हवा राहण्यासाठी आणि सातत्यपूर्ण तापमान राखण्यासाठी रेफ्रिजरेटरचा दरवाजा उघडण्याची वेळ मर्यादित करा. वापरल्यानंतर लगेचच रेफ्रिजरेटरचा दरवाजा व्यवस्थित बंद केला ना याचीही खात्री करा. यामुळे ऊर्जेचा वापरही कमी होण्यास आणि अन्नाला वारंवार थर्मल शॉक देणे टाळत अन्न अधिक काळ ताजे ठेवण्यास मदत होते
· प्री–हॉलिडे क्लीनआउट: सुट्टीच्या आधी किंवा न वापरण्याच्या विस्तारित कालावधीपूर्वी, तुमच्या अनुपस्थितीत कालबाह्य होऊ शकणाऱ्या नाशवंत वस्तू काढून टाका. यामुळे फ्रीजमध्ये दुर्गंध पसरत नाही आणि अन्न खराब होण्याचा धोका कमी होतो. नवीन काळातील फ्रीज कस्टमाइझ करण्यायोग्य मोडसह येतात. त्यामुळे तुम्ही दूर असताना ऊर्जा वाचवण्यासाठी तुमचा रेफ्रिजरेटर ‘हॉलिडे मोड’ वर सेट करू शकता.
· नियमित साफसफाई आणि सेवा देखभाल: कोणतेही अन्न फ्रीजमध्ये सांडले असेल तर ते त्वरित साफ करा, शेल्फ् पुसून घ्या आणि कालबाह्य वस्तूंची नियमितपणे तपासणी करा. स्वच्छ रेफ्रिजरेटर केवळ वाईट वास टाळतो असे नाही तर सुरक्षित अन्न साठवण देखील सुनिश्चित करतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा फ्रीज व्यवस्थित थंड होत नाहीय तर अधिकृत सेवा पुरवठादारामार्फत लगेच तपासणी करून घ्या.