Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भाडेकरू सराफी व्यावसायिकाने ‎‎दुकानमालकावर‎ झाडली गोळी आणि नंतर पोलीसात जाताना वाटेतच स्वतःला गोळी घालून केली आत्महत्या

Date:

पुणे– आर्थिक कारणावरून‎ एका सराफी व्यावसायिकाने आपल्या ‎‎दुकानमालकावर भर चौकात‎ गोळी झाडली . त्यानंतर रिक्षातून ‎‎पोलिस ठाण्यात जाताना स्वत: वर‎ गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ‎‎दुकानमालक गंभीर जखमी झाले‎असून त्यांच्यावर खासगी ‎रुग्णालयात उपचार करण्यात येत ‎‎आहेत. अनिल सखाराम ढमाले‎(५२, रा. बालेवाडी) असे‎आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आकाश ‎‎गजानन जाधव (वय ३९, रा. बाणेर) ‎‎असे जखमी झालेल्या दुकान‎मालकाचे नाव आहे. ही घटना बाणेर ‎येथील कळमकर पार्क लेनमध्ये‎ शनिवारी सायंकाळी सहा ‎वाजण्याच्या सुमारास घडली.‎

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎अनिल ढमाले हे सराफ व्यावसायिक‎आहेत. जाधव यांचे बाणेर येथील ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎हाय स्ट्रीटवर दुकान आहे. जाधव‎ यांनी ढमाले यांना १४ वर्षांपासून ‎दुकान भाड्याने दिले आहे. अनिल‎ ज्वेलर्स म्हणून हे दुकान ढमाले‎ चालवत होते. गेल्या काही‎ महिन्यांपासून त्यांच्यात आर्थिक वाद‎सुरू होता. ढमाले याने जाधव यांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चहा घेण्यासाठी घरातून खाली‎ बालावले. घराजवळील कळमकर‎पार्क लेन नं.१ येथे ते दुचाकीवरून‎येताना मागे बसलेल्या ढमालेने‎ जाधव यांच्या डोक्यात पिस्तुलातून‎ गोळी झाडली. त्यामुळे दोघेही ‎रस्त्यावर पडले.‎

‎ढमाले याने एक रिक्षा केली व ‎रिक्षाचालक सतीश यादव याला‎ रिक्षा चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याकडे‎ घेण्यास सांगितले. औंध येथील‎ भाले चौकात रिक्षा आली असताना‎ त्याने रिक्षाचालकाला मला पाणी‎घेऊन ये, असे सांगितले. यादव हे‎ पाणी आणायला गेले. तेवढ्यात‎ ढमाले याने स्वत:वर गोळीबार‎करून आत्महत्या केली.‎रिक्षामध्येच त्याचा मृत्यु झाला.‎दरम्यान, आकाश जाधव यांच्यावर‎ ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार‎ करण्यात येत असून त्यांची प्रकृती‎ गंभीर आहे. पोलीस निरिक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण ९०४९२७७९६६ अधिक तपास करत आहेत .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“डॅा. बाबा आढावांचा वारसा थांबणार नाही; सामाजिक चळवळीत आम्ही खंबीरपणे सोबत!”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची आढाव कुटुंबियांसमोर ग्वाही; सांत्वन...

एपस्टाइन फाईल १९ डिसेंबरला जाहीर होणार काय ? पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात समजून घ्या …

पृथ्वीराज चव्हाण यांनी Epstein Files बाबत भारतात उडविली खळबळ अमेरिकेच्या...