विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्या-उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

पुणे,दि.९:- विमानाने प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्याच्या लौकिकास साजेल अशा पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना उच्च आणि जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची आणि तेथील सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी आमदार सुनिल टिंगरे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, भारतीय विमानतळ प्राधिकारणाचे सरव्यवस्थापक पी.के.दत्ता, विमानतळ संचालक संतोष डोके व संबधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, नवीन विमानतळ टर्मिनल पुण्याच्या वैभवात भर घालणारे आहे. देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी पुणे येथे येतात. या नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांच्या संख्येत आणि विमानांच्या फेऱ्यांमधे वाढ होणार असून त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे. आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या टर्मिनलमुळे विमान प्रवास क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. पुण्यातून देशांतर्गत आणि विदेशी विमान प्रवासाची मोठी सोय या टर्मिनलमुळे उपलब्ध झाली असून भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करण्यात आला आहे.

नव्या टर्मिनलमुळे प्रवासी तसेच व्यावसायीक सुविधा वाढणार आहेत. विमानळ परिसरात आकर्षक इनडोअर प्लँटस् लावावे, राज्यातील आणि पुण्यातील महत्वाच्या वारसा स्थळांची माहिती मराठी भाषेसह इंग्रजी भाषेत प्रदर्शित करावी, स्वच्छतेला प्राधान्य द्यावे अशा सूचना श्री.पवार यांनी यावेळी केल्या. त्यांनी एअरोब्रिज, विमान पार्किग, खाजगी विमान पार्किंग, चेक इन काऊंटर, व्हीआयपी लाऊंज, बॅगेज हँडलींगसह इतर सुविधांची पाहणी केली व माहिती घेतली.विमानतळ संचालक श्री.डोके यांनी प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधा, आगमन-निर्गमन व्यवस्था, वाहनाची पार्किंग, बॅगेज हँडलिंग सिस्टीम, लाऊंज व अन्य सुविधांची आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या सुविधा तसेच जून्या विमानतळाच्या नूतनीकरणाबाबत माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतल्या प्राचार्याला पोक्सोची धमकी देऊन पोलिसांनीच ७ लाख लुटले-फौजदार आणि महिला मार्शलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...