Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भाजपचे लोकसभेचे इच्छुक उमेदवार सुनील देवधर यांच्याकडून कार्यक्रमांचा जोरदार धडाका

Date:

निखील वागळेंवर कारवाईची मागणी : मोदींना धन्यवाद देण्यासाठी नमो बाईक रॅली-‘सकल धनगर समाज मेळाव्या’चे आयोजन

भाजपचे लोकसभेचे इच्छुक उमेदवार, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांची पत्रकार परिषद

पुणे, ता. ६ – गेल्या महिना दीड महिन्यापासून भाजपचे लोकसभेचे इच्छुक उमेदवार, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी पुण्यात विविध असंख्य कार्यक्रमांची जोरदार मोहीम उघडल्याचे दिसत आहे आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आणखी कार्यक्रमांची घोषणा केली.

प्रभू श्रीराम जन्मभूमीसाठी सुरू असलेल्या तब्बल ५०० वर्षाच्या संघर्षाची यशस्वी पूर्तता करून श्रीक्षेत्र अयोध्या येथे भव्य अशा राममंदिराची उभारणी केली. त्यात श्रीरामललांची प्राणप्रतिष्ठापना केली. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या या कार्याचे अभिनंदन तसेच श्रीरामललांना अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते सुनील विश्वनाथ देवधर यांच्या नेतृत्वात ‘नमो पुणे अभिवादन’ या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता, कृष्णसुंदर गार्डन, डीपी रोड, एरंडवणे, पुणे येथून या रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीत पुणेकर नागरिक बंधु- भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री. देवधर यांनी केले आहे. ही रॅली म्हात्रे पूल – शास्त्री रोड- माधवराव पेशवे रोड – बाजीराव रोड – शनिवार वाडा – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रोड – एफ.सी. रोड – ज्ञानेश्वर पादुका चौक मार्गे मॉडर्न इंजीनीरिंग महाविद्यालयाच्या ठिकाणी ती संपेल. या रॅलीसाठी नागरिकांनी नोंदणी करणे अगत्याचे असून त्यासाठी त्यांनी https://www.namopune.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या बाईक रॅली तरूण- तरूणींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुनील देवधर यांनी केले आहे. श्रीरामललांची प्राणप्रतिष्ठापना स्थापना करून अखिल हिंदुस्थानाचे गर्वस्थान आणि अस्मिता असलेल्या त्यामध्ये केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश अमृतकाळाबरोबरच आता रामराज्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करू लागला आहे. अस मत ही देवधर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

‘सकल धनगर समाज मेळाव्या’चे आयोजन

सर्व धनगर समाज बांधवांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती मिळावी, यासाठी पुणे धनगर समाजाकडून ‘सकल धनगर समाज मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ फेब्रुवारी २०२४ आयोजित हा मेळावा शुभारंभ मंगल कार्यालय, म्हात्रे पुलाजवळझ डीपी रोड एरंडवणे येथे सायं. ४ वाजता होणार आहे.यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून महा ॲग्रीएफपीओचे व्यवस्थापकीय संचालक ऍड. विजय गोफणे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर उपस्थित राहणार आहेत. याच बरोबर धनगर समाजाच्या विविध संघटनांच्या प्रमुखांचा सत्कार देखील यावेळी करण्यात येणार आहे.या मेळाव्यास धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती करून घ्यावी असे आवाहन सुनील देवधर यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन फेब्रुवारी रोजी माजी उपपंतप्रधान ​​​​​​लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला.यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी त्यांचे टिव्टरवर ‘ अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला दिलेली शाबासकी’ असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरुन भाजप नेते व माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी पत्रकार वागळे यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत देवधर म्हणाले, स्वत:ला पत्रकार म्हणवणारे ज्यांचा संविधान, लाेकशाही, कायद्यावर विश्वास नाही. समाजात नेहमी अराजकता माजविण्याचा प्रयत्न करतात. त्यांना फार काेणी विचारत नसल्याने त्यांनी टिव्टरवर लालकृष्ण अडवाणी यांच्या भारतरत्नाबाबत केलेले मत अत्यंत अपमानजनक, असहनीय आहे. अडवाणी यांना दंगेखोर म्हणत त्यांनी पंतप्रधान यांना पाेस्ट हॅशटॅग केली. याचा अर्थ ते पंतप्रधान यांना दंगेखाेर म्हणतात. भारतरत्न पुरस्कार राष्ट्रपती देतात, राष्ट्रपतींचा देखील त्यांनी अपमान केला अाहे. लाेकशाही मार्गाने सर्वाच्च पदावर बसलेल्या व्यक्तींबाबत अाक्षेपार्ह भाषा करणे हा गुन्हा हाेताे त्यामुळे मी याबाबत पाेलीसांकडे तक्रार दाखल केली अाहे. पाेलीस कायदेशीर सल्ला घेऊन आवश्यक ती कारवाई करतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अखेर 21 डिसेंबरची MPSC परीक्षा लांबणीवर:आता 4 जानेवारीला होणार पेपर

मुंबई-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21...

मुंढवा प्रकरणातील आरोपी तहसीलदाराने 85.50 लाखांची थकबाकी भरली रोख…

पुणे -मुंढवा भूखंड घोटाळ्यातील आरोपी असलेल्या निलंबित...

ताडीतील भेसळ ओळखण्यासाठी “सीएचटी-किट” विकसित

तंत्रज्ञानाचे हस्तांतरण ऑथेंटिक केमिकल्स अँड रिसर्च सेंटर, टेंभुर्णी यांना पुणे:-सीएसआयआर-...