बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणे सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करण्यासाठी संघर्ष आणि संयम लागतो. हिंमत लागते, असा थेट हल्ला मनसेच्या ट्विटर हँडलवरून अजित पवार यांचे नाव न घेता करण्यात आला आहे.
बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणे सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणे, चिन्ह मिळवणे ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ !, असा टोला मनसेने लगावला आहे.
विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारावर अजित पवार गट हाच मूळ ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ असल्याचा निकाल मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. यासह राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्हही (पक्षचिन्ह) अजित पवार गटाला बहाल करण्यात आले.