Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सीताराम जिंदाल यांचा निसर्गोपचार आणि सेवाभावी कामांत उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मान

Date:

बेंगळुरू६ फेब्रुवारी २०२४: सेवाभावी काम व आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व डॉ. सीताराम जिंदाल यांना प्रतिष्ठेचा पद्मभूषण सन्मान प्रदान करण्यात आला आहे. याबद्दल भारतभरात आनंद व्यक्त केला जात आहे. अद्वितीय सेवाभावी प्रयत्नांमधील डॉ. जिंदाल यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आहे. विशेषत: निसर्गोपचार (नेचरक्युअर) क्षेत्रातील त्यांचे योगदान असामान्य आहे. औषधांविना उपचार करणाऱ्या या उपचारपद्धतीत डॉ. जिंदाल यांनी चाकोरीबाह्य योगदान दिले आहे. जिंदाल नेचरक्युअर इन्स्टिट्यूटची स्थापना त्यांनी केली असूनया कामासाठीच त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त झाला आहे. 

हरयाणातील नलवा या दुर्गम खेड्यात १९३२ साली जन्मलेल्या डॉ. जिंदाल यांच्या निसर्गोपचाराकडील प्रवास विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच सुरू झाला. या काळात त्यांना पोटातील क्षयरोगाचा (अॅबडॉमिनल ट्युबरक्युलॉसिस) सामना करावा लागला. त्यांचा आजार बरा होण्याजोगाच नाही असे वाटत असताना त्यांनी एका छोट्या निसर्गोपचार केंद्राचा आसरा घेतला. उपवास, एनिमा आणि अन्य अपारंपरिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून त्यांना खूपच दिलासा मिळाला. या रूपांतरणात्मक अनुभवामुळे त्यांच्यात निसर्गोपचार व योग यांबद्दल अविचल विश्वास निर्माण झाला. 

एक सर्वसमावेशक निसर्गोपचार व योग रुग्णालय स्थापन करण्याच्या इच्छेतून डॉ. जिंदाल यांनी १९७७-७९ या काळात बेंगळुरू शहराबाहेर मोठी जमीन घेतली. त्यातूनच जेएनआयची स्थापना झाली. जेएनआयमध्ये एक सुसज्ज संशोधन विभाग होता आणि जिंदाल अॅल्युमिनिअम लिमिटेडद्वारे (जेएएल) या विभागाला सढळ हस्ते निधी पुरवला जाऊ लागला. निसर्गोपचाराला एका नवीन उंचीवर घेऊन जाण्याप्रती डॉ. जिंदाल यांची बांधिलकी यातून दिसून येते. 

त्या काळात प्रचलित असलेल्या पारंपरिक निसर्गोपचार पद्धतींहून पूर्णपणे वेगळ्या मार्गाने जात, या विज्ञानाला आधुनिक स्वरूप देण्याच्या, त्यात नवोन्मेष आणण्याच्या उद्दिष्टाने डॉ. जिंदाल यांनी काम सुरू केले. पारंपरिक निसर्गोपचार पद्धतींमधील उत्साहाचा व विकासाचा अभाव लक्षात घेऊन त्यांनी औषधविरहित पद्धती अधिक प्रगत करण्यासाठी तसेच त्याच्या प्रसारासाठी वाहून घेतले. १९६९ मध्ये स्थापन झालेली एसजे फाउंडेशन ही संस्था त्यांच्या सेवाभावी उपक्रमांसाठी आर्थिक आधारस्तंभ ठरली. त्यांनी हे सर्व काम पूर्णपणे जेएएलच्या पाठबळावर केले. सरकार किंवा अन्य व्यक्तींकडून कोणतीही मदत मागितली नाही. 

डॉ. जिंदाल यांच्या अविश्रांत प्रयत्नांचा लक्षणीय प्रभाव औषधविरहित उपचारांच्या क्षेत्रावर पडला. जेएनआय हे एक जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून प्रस्थापित झाले. दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात अशा विविध आजारांवर यशस्वीरित्या उपचार करणारे केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. कॅन्सरच्या रुग्णांवरही केंद्रामध्ये उपचार केले जाऊ लागले. या संस्थेत आता ५५० बेड्स आहेत आणि व्याधींवर औषधविरहित उपचार करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संस्था आशेचा किरण पुरवत आहे. 

जेएनआयशिवाय डॉ. जिंदाल यांनी असंख्य सेवभावी उपक्रम राबवले. यातून सामाजिक सुधारणेप्रती त्यांची बांधिलकी दिसून येते. अॅलोपथी रुग्णालये, शाळा व महाविद्यालयांची स्थापना, ग्रामीण विकासाचे उपक्रम, आरोग्यसेवा व शिक्षणाच्या दृष्टीने गावे दत्तक घेणे आणि आरोग्यसेवा व शिक्षण या क्षेत्रांमध्ये अविश्रांत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मदत करणे या स्वरूपाचे विपुल काम त्यांनी केले आहे. 

डॉ. जिंदाल यांचे सेवाभावी उपक्रम निसर्गोपचारांच्या पलीकडे जाणारे आहेत. त्यांनी नलवा या त्यांच्या मूळगावात आठ सेवाभावी उपक्रमांची स्थापना केली आहे. याचा लाभ या परिसरातील मोठ्या लोकसंख्येला होत आहे. वंचित समुदायांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तींच्या माध्यमातून मदत करणे तसेच आरोग्यसेवा व शिक्षण यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी आर्थिक मदत देणे यांतून त्यांचे सामाजिक कल्याणाप्रती असलेले समर्पण दिसून येते. 

डॉ. जिंदाल यांच्या कामाचा प्रभाव जेएनआयच्या पलीकडेही जाणवतो. आरोग्याकडे बघण्याचा त्यांचा सर्वांगीण दृष्टिकोन, निसर्गोपचार व योगावर भर देणे यांमुळे जगभरातील लक्षावधी लोकांच्या आयुष्यांमध्ये परिवर्तन घडून आले आहे. प्रतिबंधात्मक उपायांप्रती तसेच औषधांच्या साइड-इफेक्ट्सबद्दल जागरूकता निर्माण करण्याप्रती त्यांची बांधिलकी, निसर्गोपचार अॅलोपॅथिक रुग्णांवरील ताण लक्षणीयरित्या कमी करू शकतो या त्यांच्या विश्वासाशी संलग्न आहे. 

या संपूर्ण प्रवासात डॉ. जिंदाल यांनी असंख्य नवोन्मेष्कारी उत्पादने आणि उपचारपद्धती विकसित केल्या. अनेक आजारांवर ते गुणकारी ठरत आहेत. सुलभ अॅबडोमेन पॅक्सपासून हर्बल चहांपर्यंत, स्पायनल बाथ टब्ज, थंड व उष्ण रिफ्लेक्सॉलॉडजी ट्रॅक्सपर्यंत अनेक नवोन्मेष्कारी उत्पादने त्यांनी विकसित केली आहेत. त्यांच्या योगदानामुळे निसर्गोपचाराच्या कक्षा रुंदावल्या आहेत. 

डॉ. जिंदाल यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाची आणि अफाट योगदानाची दखल अनेक महान व्यक्तींनी घेतली आहे. यामध्ये अटल बिहारी वाजपेयीचंद्रशेखरइंद्रकुमार गुजरालएच. डी. देवेगौडा हे माजी पंतप्रधानमाजी उपपंतप्रधान देवीलाल आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचा समावेश होतो. 

समाजाच्या कल्याणासाठी डॉ. जिंदाल यांनी केलेले अविश्रांत प्रयत्न हे आरोग्यसेवेच्या पलीकडील आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) या संकल्पनेचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला. उद्योजकांनी त्यांच्या नफ्याचा काही भाग दारिद्र्य निर्मूलनाच्या कामासाठी द्यावा असे आवाहन त्यांनी केले. उद्योगांसाठी निश्चित करून दिलेली सीएसआरची टक्केवारी वाढवण्यासाठी अद्याप ते सरकारसोबत संघर्ष करत आहेत. यातून समाजाच्या कल्याणाप्रती त्यांची अविचल बांधिलकी दिसून येते. 

डॉ. सीताराम जिंदाल यांचे आयुष्य व कार्य म्हणजे व्यावसायिक यश व मानवतेच्या अनुकंपायुक्त सेवेचा सौहार्दपूर्ण संयोग आहे. निसर्गोपचार व सेवाभावी कामातील समर्पणाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यसेवा व सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रांवर कधीही पुसला न जाणारा ठसा उमटवला आहे. म्हणूनच ते पद्मभूषण सन्मानाचे पात्र मानकरी ठरले आहेत. 

प्रख्यात व्यक्तिमत्वांद्वारे प्रशंसा

१. श्री. अटल बिहारी वाजपेयीभारताचे माजी पंतप्रधान: जिंदाल इन्स्टिट्यूट ऑफ नेचरोपथीमध्ये मी घालवलेले १० दिवस माझ्या स्मृतीच्या पटावर नेहमीच लखलखीत ताऱ्याप्रमाणे चमकत राहतील. वैद्यकशास्त्राच्या अन्य शाखांच्या तुलनेत निसर्गोपचार ही अधिक चांगली व्यवस्था आहे. कारण यात आजार दूर करण्यासाठी औषधांचा वापर केला जात नाही. ही संस्था स्थापन केल्याबद्दल मी डॉ. सीताराम जिंदाल यांचे अभिनंदन करतो. 

२. श्री. चंद्रशेखरभारताचे माजी पंतप्रधान: मला आणि पिलू मोदी यांना या संस्थेत येण्यास भाग पाडल्याबद्दल मी माझे मित्र वीरेन शहा यांचा ऋणी आहे. त्यामुळेच आम्ही या संस्थेत चाललेले मानवतेच्या सेवेचे महान कार्य स्वत: बघू शकलो. श्री. सीताराम जिंदाल यांनी हा प्रकल्प हाती घेतला याचा मला आनंद वाटतो. त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. मी त्यांना शुभेच्छा देतो. 

३. श्री. आय. के. गुजरालभारताचे माजी पंतप्रधान: मी आणि माझी पत्नी दोघांनीही येथे ३ अविस्मरणीय आठवडे घालवले आणि निसर्गोपचार व योगाच्या दैनंदिन आयुष्यातील उपयुक्ततेबाबतची आमची मतेच बदलून गेली. येथे राहणे आमच्यासाठी खूप चांगले ठरले आहे. श्री. एस. आर. जिंदाल यांनी या संस्थेच्या स्वरूपात राष्ट्राला अनोखी भेट दिली आहे. ते अत्यंत द्रष्टे आहेत. त्यांचे समर्पण व मानवी मूल्यांप्रती त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. 

४. श्री. एच. डी. देवेगौडाभारताचे माजी पंतप्रधान: मी डॉ. सीताराम जिंदाल यांना गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून उद्योजक व दानशूर व्यक्ती म्हणून ओळखतो. ते ग्रामीण भागातील गरीबांसाठी खूप काम करत आहेत. शिक्षण, आरोग्य, पेयजल आदी क्षेत्रांतील त्यांच्या सेवेबद्दल अनेक गावकरी त्यांचे ऋण व्यक्त करतात. बेंगळुरूमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ नेचरोपथी स्थापन करून त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. हे एक आधुनिक औषधविरहित निसर्गोपचार रुग्णालय आहे. त्याचप्रमाणे येथे अनेक सेवाभावी उपक्रमही राबवले जातात. 

५. श्री. देवी लालभारताचे माजी उपपंतप्रधान: निसर्गरम्य परिसरात स्थापन करण्यात आलेली ही निसर्गोपचार संस्था शरीराला आणि मनालाही अत्यावश्यक असा दिलासा पुरवते. माझ्या १५ दिवसांच्या मुक्कामामध्ये मला तर खूपच लाभ झाला. श्री. सीतारामजी स्वत:च्या खर्चाने मानवतेचे कल्याण करणारी उत्तम सेवा देत आहेत.

६. श्री. रामकृष्ण हेगडेकर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री: मी या संस्थेत नेमाने वर्षातून एकदा येतो आणि १० दिवस येथे राहतो. हे मी गेल्या अकरा वर्षांपासून करत आहे. ही जगाच्या पाठीवरची सर्वोत्तम संस्था आहे. आदर्श वातावरणात असलेल्या या संस्थेत पारंपरिक व आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या सुविधा आहेत. ही अनन्यसाधारण संस्था स्थापन करणाऱ्या श्री. सीताराम जिंदाल यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...