पुणे, ता. ५फेब्रुवारी २०२४: पाककला क्षेत्रातील ऐतिहासिक आणि भव्य अशा दहाव्या आंतरराष्ट्रीय
आयआयएचएम यंग शेफ ऑलिम्पियाडमध्ये यंदा अझरबैजानच्या लेला वलीयेवा हिने सुवर्णपदक जिंकले. फिलिपिन्सच्या क्लिफर्ड जेफ कॅड्युंगो उनाबिया आणि नेपाळच्या कमल थापा यांनी रौप्यपदक मिळवले, तर इटलीच्या फ्रान्सिस्को ओरसीने कांस्यपदक पटकावले. कोलकता येथे झालेल्या शानदार समारोप समारंभात विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
जागतिक पातळीवरील नामांकित अशी ही भव्य पाककला स्पर्धा भारतातील सहा शहरांमध्ये सात दिवस चालली. त्यानंतर या भव्य स्पर्धेचा अंतिम टप्पा कोलकता येथे पार पडला. जगातील ६० हून अधिक देशांना जोडणारी ही स्पर्धा अतिशय भव्य स्वरुपामुळे जगभर ओळखली जाते. स्पर्धेचा समारोप समारंभही तितकाच भव्य आणि शानदार होता. कोलकत्यातील प्रसिद्ध वेट ओ वाइल्ड मनोरंजन उद्यान येथे हा समारंभ झाला. या समारंभात पहिल्या तीन बक्षीसांव्यतिरिक्त आयआयएचएम यंग शेफ ऑलिम्पियाडमध्ये विशेष श्रेणीतील विजेत्यांनाही पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेतील ११ ते २० क्रमांकांच्या पुढील सर्वोत्कृष्ट संघांमध्ये आयोजित करण्यात आलेली प्लेट ट्रॉफी फेरी भारताच्या लेनिन बोपण्णाकडे गेली. किचन कट मॅनेजमेंट पुरस्कार न्यूझीलंडला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट शाकाहारी डिशचा पुरस्कार नेपाळला, तर सर्वोत्कृष्ट क्रेमे सुफले अ ला ऑरेंज पुरस्कारावर इटलीने नाव कोरले.
प्रत्येक मार्गदर्शकाच्या शिफारशींच्या आधारे सहा सर्वोत्कृष्ट मेंटॉर नॉमिनेशन पुरस्कारही प्रदान करण्यात आले. ग्रीस, जॉर्डन, नेदरलँड्स, इथिओपिया, बोत्सवाना आणि इक्वेटोरियल गिनी या देशांना हा पुरस्कार पटकावला. ऑस्ट्रेलिया, अझरबैजान, नायजेरिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि नेपाळ या देशांनी सर्वोत्कृष्ट यंग शेफ अॅम्बेसेडर पुरस्कार मिळविले. स्पर्धेदरम्यान सर्वोत्कृष्ट स्वच्छता आणि स्वयंपाकघरातील कामकाज पद्धत यावर आधारितही पुरस्कार देण्यात आले. नामिबिया, पोर्तुगाल, इंग्लंड, बल्गेरिया, आर्मेनिया, अझरबैजान या सहा देशांनी हा पुरस्कार जिंकला. स्वयंपाक करताना आवश्यक गोष्टी कापण्याचे, चिरण्याचे कौशल्य, चाकुचा उत्तम वापर यासाठीचे बेस्ट नाइफ स्किल्स पुरस्कार थायलंड, पोर्तुगाल, इंडोनेशिया, बल्गेरिया, आर्मेनिया आणि अझरबैजान या देशांना मिळाला. लॉर्ड बिलिमोरिया रायझिंग स्टार्स पुरस्कार नामिबिया, अल्बेनिया, उझबेकिस्तान, मॉरिशस, आयर्लंड आणि ओमान यांनी पटकावला. गोल्ड ग्लोबल सस्टेनेबिलिटी पुरस्काराचा मान केनियाला मिळवला. स्पिरिट ऑफ यंग शेफ ऑलिम्पियाड आंतरराष्ट्रीय पुरस्कार लेसोथोला मिळवला.
डॉ. बोस चॅलेंज ट्रॉफी ही केनिया आणि स्वित्झर्लंडला गेलेल्या अंतिम २० संघांमध्ये न आलेल्या सहभागींसाठी यावर्षी सादर करण्यात आली होती.
इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काउन्सिलद्वारे (आयएचसी) आयोजित आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटद्वारे (आयआयएचएम) आयोजित यंग शेफ ऑलिम्पियाड हा वन वर्ल्ड वन यंग शेफ ऑलिम्पियाडच्या भावनेचा खरा उत्सव होता.
यंग शेफ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेच्या परीक्षकांमध्ये जगभरातील प्रसिद्ध शेफचा समावेश होता. या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष ओबीईचे प्रोफेसर डेव्हिड फॉस्केट हे होते, तर किचन कटचे संस्थापक आणि संचालक शेफ जॉन वुड या कार्यक्रमाचे मुख्य परीक्षक होते. उपमुख्य परीक्षक शेफ प्रसिद्ध शेफ आणि रेस्टोरेटर राहुल आकेरकर हे होते. परीक्षकांमध्ये स्कॉटलंडचे नॅशनल शेफ गॅरी मॅक्लीन, सिसिलियन शेफ एन्झो ऑलिवेरी, पेस्ट्री शेफ आणि चॉकलेटियर साराह हार्टनेट, दातोचे शेफ अब्दुल • वहाब झामझानी, मलेशियातील सेलिब्रिटी शेफ नील रिपिंगटन यांच्यासह आयआयएचएमचे आंतरराष्ट्रीय संचालक आणि डॉर्चेस्टर कलेक्शनचे कार्यकारी शेफ मारियो परेरा यांसारख्या या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील प्रसिद्ध तज्ज्ञांचा समावेश होता.
यंग शेफ ऑलिम्पियाड २०२४ ने संयुक्त राष्ट्रांच्या १७ शाश्वत विकास उद्दिष्टांना (एसडीजीएस) प्रोत्साहन देणारी शाश्वतता ही महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण संकल्पना स्वीकारली आहे. जगाला एक उत्तम ठिकाण बनवण्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या १७ शाश्वत विकास उद्दिष्टांवर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झेनोबिया नादिरशॉ डायमंड रिसर्च अॅवॉर्ड देण्यात आला. या प्रकारातील चार पुरस्कार केनिया, बांगलादेश, भारत आणि इटली यांनी पटकावले.
“अशा प्रकारचा भव्य आणि शानदार कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अशा संस्थेची आणि नेतृत्वाची आवश्यकता आहे, जी देशभरात पसरलेल्या संस्थांशी जोडलेली आहे. जी विविध ठिकाणांहून आलेल्या लोकांचे व्यवस्थापन करते आणि जिचे हजारो माजी विद्यार्थी जगभरात असून, जगभरात जी लोकप्रिय आहे, असे मत यंग शेफ ऑलिम्पियाडचे मुख्य परीक्षक आणि मेंटॉर, पद्मश्री शेफ संजीव कपूर यांनी व्यक्त केले.
“अनेकदा आव्हानात्मक काळ असा येतो, जेव्हा सगळे ठप्प असते. कोविड साथीच्या काळात तेच झाले.
या काळाने आम्हाला आरोग्य आणि टिकावूपणाचे महत्त्व शिकवले. अन्नाचे महत्त्व शिकविले. यंग शेफ ऑलिम्पियाडने या स्पर्धेत खाद्यपदार्थ आणि टिकाऊपणा या दोन्ही गोष्टींना मूर्त रूप दिले आहे याचा मला खूप आनंद आहे,” असे हॉटेल आणि पर्यटन उद्योगातील प्रख्यात उद्योजक आणि यंग शेफ ऑलिम्पियाडच्या जागतिक सल्लागार समितीचे अध्यक्ष नकुल आनंद यांनी सांगितले.
“यंग शेफ ऑलिम्पियाड २०२४ अनेकबाबतीत विशेष होते. यंदाचे हे दहावे वर्ष होते. हे एक अद्भुत दशक होते ज्यामध्ये देश, मार्गदर्शक, परीक्षक आणि सहभागी असलेल्या प्रत्येकाकडून उत्तम पाठिंबा मिळाला आहे. आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या १७ शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यापारी संघटनेचे महासचिव झुरब पोलोलिकाश्विली यांच्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि आम्हाला त्यांचा ‘पाठिंबा मिळाला याचा अभिमान आहे. या विशेष कारणामुळे या या वर्षी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांनी विशेष शेफ जॅकेटचे उद्घाटन करून या स्पर्धेचे अनावरण केले. यंग शेफ ऑलिम्पियाड हे युथ कलिनरी डिप्लोमसीला चालना देणारे सर्वांत मोठे व्यासपीठ आहे, जे तरुणांच्या सामथ्यनि जगाला एकत्र आणण्याचे व्यासपीठ आहे. यंग शेफ ऑलिम्पियाड येत्या काही वर्षांत वन वर्ल्ड
वन वायसीओची भावना साजरे करत राहील आणि या उद्देशाने पुढे जात राहील” असे इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काउन्सिलचे (आयएचसी) अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. सुबोर्नो बोस म्हणाले.
आयआयएचएम यंग शेफ ऑलिम्पियाडमध्ये अझरबैजान सुवर्णपदक विजेता, फिलिपिन्स आणि नेपाळला रौप्य, इटलीला कांस्यपदक
Date:

